शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘बनी बेगम बाग’ला गतवैभव प्राप्त होणार

By admin | Updated: August 20, 2014 00:57 IST

मुजीब देवणीकर, औरंगाबाद खुलताबादेतील बनी बेगम बागला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय साह्यता निधीतून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

मुजीब देवणीकर, औरंगाबादऐतिहासिक औरंगाबाद शहरापासून अवघ्या २३ कि. मी. अंतरावर असलेल्या खुलताबादेतील बनी बेगम बागला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी केंद्रीय साह्यता निधीतून तब्बल १ कोटी ५६ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. या निधीतून राज्य पुरातत्व विभागातर्फे संपूर्ण उद्यानाचा कायापालट करण्यात येणार आहे.मागील दोन दशकांपासून बनी बेगम उद्यानाची डागडुजी करावी, पर्यटकांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, जागतिक पातळीवर या उद्यानाची जनजागृती करावी, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र, राज्य पुरातत्व विभाग आणि एमटीडीसी या कामात पुढाकार घ्यायला तयार नव्हती. २०१० मध्ये उद्यानाच्या डागडुजीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. २०११ मध्ये हा निधी मंजूर झाला. मात्र विविध कारणांमुळे हा निधी प्राप्त होत नव्हता. २०१४ मध्ये प्रत्यक्ष निधी प्राप्त झाला आहे.एमटीडीसीकडे हा निधी आला असून, त्यातील ३२ लाख रुपयांचा पहिला हप्ता राज्य पुरातत्व विभागाला वर्ग करण्यात आला असल्याची माहिती एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक पांडुरंग कुलकर्णी यांनी दिली. उद्यानाचा कायापालट चांगला आणि दर्जेदार पद्धतीने व्हावा या दृष्टीने हे काम राज्य पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आले आहे.ऐतिहासिक वारसा दुर्लक्षितमुगल शासक औरंगजेब यांचा नातू बेदार बख्त यांची पत्नी बनी बेगम ऊर्फ जहाँ बानो यांची कबर उद्यानात आहे. मुगल साम्राज्यातील एक देखणा आणि वास्तुकलेचा सुंदर नमुना म्हणून या बागेकडे पाहिल्या जाते. मागील अनेक वर्षांपासून ही बाग दुर्लक्षित होती. बागेत एकही पर्यटक फिरकत नाही. खुलताबादेतील विविध पर्यटक व धार्मिक स्थळांचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने या शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. या शहरात दररोज शेकडो पर्यटक आणि भाविक येतात. मात्र, शासनाने शहरात पर्यटकांसाठी कोणत्याही मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत.