बाळासाहेब नाईक हे आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:28 IST2020-12-17T04:28:56+5:302020-12-17T04:28:56+5:30

औरंगाबाद : रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब नाईक म्हणजे संघ प्रचारक यंत्रणेतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी ...

Balasaheb Naik lost his ideal personality | बाळासाहेब नाईक हे आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले

बाळासाहेब नाईक हे आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले

औरंगाबाद : रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब नाईक म्हणजे संघ प्रचारक यंत्रणेतील एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपतराय यांनी येथे व्यक्त केले.

रा.स्व.संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाळासाहेब नाईक यांचे १८ नोव्हेंबरला वयाच्या ७८ व्या वर्षी कुशीनगर येथे निधन झाले. बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि समन्वय मंचातर्फे ११ डिसेंबर रोजी श्रध्दांजली सभा घेण्यात आली. यावेळी चंपतराय यांनी बाळासाहेबांच्या जीवनातील प्रेरक प्रसंगांची माहिती देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला.

आनंद चैतन्य महाराज, मधुभाई कुलकर्णी तसेच शामराव नाईक यांनी नाईक यांना श्रध्दांजली अर्पण केली. यावेळी दिलीप कस्तुरे यांनी समन्वय गीत सादर केले. प्रास्ताविक संजय बारगजे यांनी केले. श्रीकांत काशिकर यांनी सूत्रसंचालन केले. दयाराम बसय्ये यांच्या शांती मंत्रानंतर श्रध्दांजली सभेची सांगता झाली.

फोटो ओळी

बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करताना विश्व हिंदू परिषद आणि समन्वय मंचातर्फे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव चंपतराय, आनंद चैतन्य महाराज, मधुभाई कुलकर्णी तसेच शामराव नाईक.

Web Title: Balasaheb Naik lost his ideal personality