शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
3
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
4
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
5
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
6
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
7
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
8
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
9
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
10
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
11
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
12
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
13
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
14
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
15
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
16
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
17
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
18
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
19
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
20
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीची बिले देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: May 13, 2014 01:15 IST

धारुर: तालुक्यातील पिंपरवडा येथे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसिंचन विहिरीचे काम पृूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे.

धारुर: तालुक्यातील पिंपरवडा येथे महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जलसिंचन विहिरीचे काम पृूर्ण होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. एवढा कालावधी उलटूनही पंचायत समितीतील संबंधित विभागातील कर्मचारी बिले काढत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. विहिरीची प्रलंबित बिले देण्यास टाळाटाळ करणार्‍या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे. धारुर तालुक्यातील पिंपरवडा येथे २००८ ते ०९ या कालावधीमध्ये महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जलसिंचन विहिरी खोदण्यासाठी प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती. याच कालावधीमध्ये ग्रामसेवक संघटनेचा या योजनेच्या कामावर बहिष्कार होता. बहिष्कार मागे घेतल्यानंतर दीर्घ काळाच्या विलंबाने कामे सुरू करण्यात आली. कामे सुरू असताना पंचायत समितीमध्ये मजुराचे हजेरीपट उपलब्ध नव्हते. कामे पूर्ण करुनही मजुराचे मानधन देण्यास दीर्घ काळ उशीर झाला. या परिस्थितीतही विहिरीचे काम पूर्ण करण्यात आली आहेत. कामे पूर्ण करुनही पंचायत समितीतील संबंधित विभागातील शाखा अभियंता, सहायक, ग्रामसेवक यांनी कामे पूर्ण करुनही उर्वरित बिले देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे लाभार्थी शेतकर्‍यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. जलसिंचन विहिरीची प्रलंबित बिले देण्यास टाळाटाळ व आर्थिक पिळवणूक करुन कर्तव्यात कसूर करणार्‍या संबंधित अधिकारी, कर्मचार्‍यांच्या गलथान कारभाराची चौकशी करुन कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकर्‍यांमधून केली जात आहे. या भ्रष्ट व कामचुकार अधिकार्‍यांची चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा हनुमंत तिडके, श्रीमंत तिडके, दत्तू तिडके, संजय तिडके आदी शेतकर्‍यांनी दिला आहे. शेतकर्‍यांमधून संताप शेतकर्‍यांना पंचायत समितीतील संबंधित विभागातील कर्मचार्‍यांकडून वेळेवर बिले न मिळाल्याने त्यांच्यामधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या शेतकर्‍यांनी वेळेवर बिले न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कार्यवाही करावी, अशी मागणीही या शेतकर्‍यांनी केली आहे. शेतकर्‍यांनी उग्ररुप धारण केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. बिले देण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी दीड वर्षाचा कालावधी उलटूनही पंचायत समितीतील कर्मचारी बिले काढत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात. प्रलंबित बिले देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा दिला इशारा. पिंपरवडा येथे २००८ ते ०९ या कालावधीमध्ये महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जलसिंचन विहिरी खोदण्यासाठी देण्यात आली आली होती प्रशासकीय मंजुरी.