शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगपुऱ्यातील भाजीमंडई उठविली

By admin | Updated: May 19, 2015 00:53 IST

औरंगाबाद : मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी औरंगपुऱ्यातील रस्त्यावरील भाजीमंडईही उठविली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेल्या टपऱ्या, हातगाड्या पथकाने जप्त केल्या.

औरंगाबाद : मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने सोमवारी औरंगपुऱ्यातील रस्त्यावरील भाजीमंडईही उठविली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेल्या टपऱ्या, हातगाड्या पथकाने जप्त केल्या. तसेच रस्त्यावर खाली बसलेल्या विक्रेत्यांनाही हुसकावून लावण्यात आले. परिणामी बऱ्याच दिवसांपासून अरुंद बनलेला हा रस्ता मोकळा झाला. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या पुढाकाराने शहरात वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू झाली. आठवडाभरापासून विविध भागांत कारवाई केली जात आहे. आतापर्यंत गजानन महाराज मंदिर रस्ता, मुकुंदवाडी आणि शहागंज येथील रस्त्यांवरील भाजीमंडई आणि इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर मनपाच्या वतीने शहरातील मध्यवर्ती भागात औरंगपुरा येथे कारवाई करण्यात आली. बऱ्याच दिवसांपासून येथे मुख्य रस्त्यावरच भाजीमंडई भरत होती. दुपारी ४ वाजेच्या सुमारास पथकाने येथे कारवाईला सुरुवात केली. दोन्ही बाजूंच्या हातगाड्या, टपऱ्या उचलून जप्त करण्यात आल्या. कारवाई सुरू होताच एकच धावपळ उडाली. अनेक विक्रेत्यांनी घाईघाईने त्यांचे सामान आणि हातगाड्या दुसरीकडे हटविल्या. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही कारवाई सुरूच होती. कारवाईदरम्यान काही महिला विक्रेत्यांना रडू कोसळले. दोन तास चाललेल्या या कारवाईत सुमारे साठहून अधिक टपऱ्या आणि हातगाड्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे सायंकाळी औरंगपुऱ्यातील रस्ता पूर्णपणे मोकळा झाला. पुंडलिकनगर रस्त्यावरील दुकाने सीलमनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने पुंडलिकनगर रोडवरही कारवाई केली. याठिकाणी आजरा मार्केटमधील ११ टपऱ्या हटविण्यात आल्या. आठ महिन्यांपूर्वी मालमत्ता कर थकल्यामुळे येथील ३० दुकाने सील करण्यात आली होती; परंतु नंतरच्या काळात तेथील व्यापाऱ्यांनी हे सील तोडून त्यात पुन्हा व्यवसाय सुरू केला होता. आज त्या सर्वांना हुसकावून लावण्यात आले.