शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
3
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
4
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
5
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
7
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
8
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
9
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
10
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
11
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
12
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
13
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
14
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
15
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
16
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
17
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
18
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
19
सांगली हादरली! किरकोळ वादातून पतीने डोक्यात रॉड घालून पत्नीची केली हत्या; मुलाला मित्राकडे सोडून पती फरार
20
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या डिझायनरचा दिल्लीत डंका; वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी डिझाईनची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 13:17 IST

दिल्ली सरकारने शहरात १५६ वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. ज्या कंपनीला या कामाच्या निविदा मिळाल्या, त्या कंपनीने वातानुकूलित बसथांबा डिझाईनची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये औरंगाबादचे डिझायनर राजन प्रधान यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी बनविलेल्या डिझाईनला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे आगामी दोन महिन्यांत दिल्लीत या डिझाईनचेच बसथांबे उभारण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देदिल्ली सरकारने शहरात १५६ वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. कंपनीला या कामाच्या निविदा मिळाल्या, त्या कंपनीने वातानुकूलित बसथांबा डिझाईनची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये औरंगाबादचे डिझायनर राजन प्रधान यांनी सहभाग नोंदवला.

औरंगाबाद : दिल्ली सरकारने शहरात १५६ वातानुकूलित बसथांबे उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. ज्या कंपनीला या कामाच्या निविदा मिळाल्या, त्या कंपनीने वातानुकूलित बसथांबा डिझाईनची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये औरंगाबादचे डिझायनर राजन प्रधान यांनी सहभाग नोंदवला. त्यांनी बनविलेल्या डिझाईनला या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे आगामी दोन महिन्यांत दिल्लीत या डिझाईनचेच बसथांबे उभारण्यात येणार आहेत.

दिल्लीतील नगर निगमने शहरात विविध ठिकाणी वातानुकूलित बसथांबे उभारण्याची योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १५६ ठिकाणी प्री-असेम्बल्ड प्रकारचे बसथांबे उभारले जातील. बसथांबे उभारणीचे ज्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाले, त्यांनी देशभरातून विविध डिझायनरची स्पर्धा आयोजित केली. यामध्ये आयआयटीसह इतर नामांकित संस्थांमधील ५०० हून अधिक डिझायनर्सने सहभाग नोंदवला. औरंगाबादचे डिझायनर राजन प्रधान यांनीही यात सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या डिझाईनला या स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. ज्या डिझाईनला प्रथम क्रमांक मिळाला, तेच डिझाईन वातानुकूलित बसथांबे बनविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यानुसार व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या अतिशय लाभदायक असे डिझाईन दिल्लीतील बसथांबे बनविण्यासाठी वापरले जाणार असल्याचे राजन प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कसे आहे डिझाईनवातानुकूलित बसथांब्यांचे बनविलेले डिझाईन व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. एकाच जागी असेम्बल करून बसथांबा कुठेही नेऊन स्थापित करता येऊ शकतो. संमिश्र साहित्य ते मेटल फ्रेमवर्कपासून बसथांबा बनवला जाणार आहे. या बसथांब्यावर मुबलक ब्रँडिंगची सोय, प्रकाश योजना, एर्गोनॉमिक्स असणार आहे. याशिवाय अत्यंत कमी खर्चात आणि पोर्टेबिलिटीच्या गुणधर्मामुळे या डिझाईनला प्राधान्य मिळाल्याचे राजन प्रधान यांनी सांगितले.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद