शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
दिल्ली स्फोटाचे गुपित उघडले; कारमधील मृतदेह डॉ. उमर नबीचाच, DNA रिपोर्ट समोर
3
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
4
“नगरपालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा लढवण्यावर असेल भर, सत्तेची नाही विचारांची लढाई”: सपकाळ
5
"आता सगळं देवाच्या हातात आहे...", धर्मेंद्र यांच्या तब्येतीबाबत बोलताना हेमा मालिनी भावुक, म्हणाल्या- "मुलं रात्रभर..."
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
9
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
10
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
11
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
12
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
13
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
14
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
15
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
16
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
17
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
18
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
19
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची रणधुमाळी: भाजप, काँग्रेसकडून बी फॉर्मचे वाटप; तीन-चार दिवसांत उमेदवारही ठरणार
20
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ

औरंगाबादकरांवर नवीन संकट; बिल थकल्याने महापालिकेचे टँकर संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:20 IST

. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले.

औरंगाबाद : शहरातील ११० पेक्षा अधिक वसाहतींमधील सुमारे ३ लाख नागरिकांची तहान टँकरद्वारे भागविण्यात येते. महापालिकेने टँकर कंत्राटदाराला मागील चार महिन्यांपासून बिल न दिल्याने त्यांनी अनेकदा प्रशासनाला तोंडी, लेखी सूचना केली. प्रशासनाने त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. शुक्रवारी कंत्राटदाराने संपाचे हत्यार उपसले. शुक्रवारी ज्या वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचा होता, त्यांना पाणी देता आले नाही. महापालिकेने पर्यायी व्यवस्थाही न केल्याने नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे.

महापालिका अगोदरच कचरा प्रशासनात बरीच संकटात सापडली आहे. दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याच्या मुद्यावर तळ्यातमळ्यात सुरू आहे. वारंवार जलवाहिन्या फुटत असल्याने पाणीपुरवठा विभागाची अधिक गोची झाली आहे. त्यातच शुक्रवारी अचानक टँकरचालकाने संप पुकारला. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली. महापालिकेने ज्या वसाहतींमध्ये जलवाहिन्या टाकलेल्या नाहीत, त्या वसाहती मागील अनेक वर्षांपासून टँकरवर अवलंबून आहेत. महापालिका नागरिकांकडून अगोदरच पैसे भरून घेते. एक दिवसाआड टँकरद्वारे दोन ड्रम प्रत्येकाला पाणी देण्यात येते. सिडको एन-७ येथील पाण्याच्या टाकीवरून १८ टँकर चालविण्यात येतात. एक टँकर दररोज पाच ट्रीप पाणीपुरवठा करीत असतो.

एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर ३४ टँकर आहेत. येथील टँकर दिवसभरात १७० ट्रीप पाणीपुरवठा करतात. कोटला कॉलनी येथून सुमारे १८ टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. सातारा-देवळाई भागातही नागरिकांची तहान भागविण्यासाठी याच कंत्राटदाराची नेमणूक केली आहे. शुक्रवारी टँकरचा पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांनी एन-७ आणि एन-५ येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेतली. कंत्राटदाराने संप पुकारल्याची माहिती नागरिकांना मनपा प्रशासनाकडून देण्यात आली. आम्ही अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत. महापालिकेने पर्यायी व्यवस्था करून पाणी द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली. मात्र, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली.

या वसाहती टँकरवरहर्सूल, गारखेडा, विजयनगर, पडेगाव, मिटमिटा, जयभवानीनगर, संघर्षनगर, नक्षत्रवाडी, सातारा-देवळाई आदी भागांतील वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो.

टँकर सेंटर    संख्या    फेऱ्यासिडको एन-५    १८    ९०सिडको एन-७    ३४    १७०कोटला कॉलनी    १८    ९०नक्षत्रवाडी    ०५    २५ 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीWaterपाणी