शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 07:50 IST

Marriage News: अकोल्यातील एका तरुणाने परवा, शनिवारी चक्क ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच विनंती केली की, माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही!, या तरुणाने दिलेले हे निवेदनवजा पत्र पाहून पवार व त्यांच्यासमवेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही स्तब्ध झाले.

अकोला - ग्रामीण भागातील लग्नाळू मुलांना कोणी मुली देत नाही, त्यांची वये निघून चालली आहेत, ही गंभीर सामाजिक समस्या बहुतेकांना चांगलीच माहीत आहे. तथापि, स्थानिक पातळीवर ही समस्या सुटण्याची आशा संपल्याने असे तरुण आता थेट देशपातळीवरील नेत्यांना साकडे घालू लागले आहेत. अकोल्यातील एका तरुणाने परवा, शनिवारी (८ नोव्हेंबर) चक्क ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनाच विनंती केली की, माझे लग्न होत नाहीये, कृपया मला पत्नी मिळवून द्या, मी तुमचे उपकार विसरणार नाही! 

अकोल्यात शनिवारी पवार यांचा शेतकरी संवाद कार्यक्रम झाला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांवर अनेक जण बोलले. काहींनी निवेदने दिली. त्यापैकी एक निवेदनवजा पत्र पाहून पवार व त्यांच्यासमवेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेही स्तब्ध झाले. हे पत्र त्यांनी दुसऱ्या दिवशी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखविले. तिघांमध्ये या पत्रावरून चर्चा झाली. 

एकाकीपणा आता असह्य झाला !स्वत:चा पत्ता आणि मोबाइल नंबरसह शरद पवार यांना विनंती करताना हा तरुण म्हणताे, ‘माझे वय वाढतेय, भविष्यात माझे लग्न होणार नाही, मी एकटाच राहीन. तरी माझ्या जीवनाचा विचार करून मला पत्नी मिळवून द्यावी. मला कोणत्याही समाजातील मुलगी चालेल. तिच्या घरी राहायलाही तयार आहे. तिथे चांगले काम करीन आणि संसार नीट चालवीन, याची हमी देतो.’ हा तरुण पत्राचा शेवट, मला जीवनदान द्यावे, तुमचे उपकार मी विसरणार नाही, अशा शब्दांत करतो. सामान्य माणूस अजूनही शरद पवारांकडे किती आशेने पाहतो, याचे हे निदर्शक ठरावे. हे पत्र अस्वस्थ करणारे आहे. अपुरे शिक्षण, बेरोजगारी व गरिबीच्या चक्रात पिळून निघणाऱ्या ग्रामीण तरुणांच्या वेदना या पत्राने समोर आणल्या आहेत. 

- साेलापूरच्या नवरदेव मोर्चाची आठवण : डिसेंबर २०२२ मध्ये सोलापूरमध्ये लग्नाळू तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढला हाेता. फेटा, मुंडावळ्या, वाजंत्री आणि घोड्यावर बसलेले २५ पेक्षा अधिक नवरदेव नवरी मिळावी अशी मागणी करीत निघाले होते. लग्नासाठी योग्य मुलींची स्थळे येत नसल्याने हे आंदोलन झाले होते. - ग्रामीण भागातील समाजकारण, अर्थकारण पूर्णपणे बदलल्यामुळे शिक्षण, नोकरी, छोकरी, सुखी संसार ही तीन-चार दशकांपूर्वीचा तरुणांचा जीवनक्रम आता पूर्ण बदलला आहे. मुलामुलींचे लिंग गुणोत्तर बदलले.- मुलींची संख्या कमी झाली. जोडीदाराकडून मुलींच्या अपेक्षाही वाढल्या. शहरी व नोकरदार मुलगा हवासा वाटू लागला. परिणामी, नोकरी नसलेले तरुण बिनलग्नाचे राहू लागले. विवाहसंस्था अडचणीत आली. नवी सामाजिक विषमता रूजू लागली.  

English
हिंदी सारांश
Web Title : Akola youth pleads with Sharad Pawar to find him a wife.

Web Summary : Frustrated with his inability to find a wife, an Akola youth appealed to Sharad Pawar for help. Citing societal issues and personal desperation, he offered to live with her family and ensure a good life. The letter highlights rural youth's struggles.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारmarriageलग्नAkolaअकोला