शहरं
Join us  
Trending Stories
1
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
4
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
5
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
6
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
7
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
8
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
9
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
10
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
11
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
12
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
13
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
14
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
15
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
16
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
17
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
18
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
19
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
20
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत होणार बसपोर्ट

By admin | Updated: January 5, 2016 00:17 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाबरोबर प्रवासी वाहतूक सुविधा अधिकाधिक अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रवाशांच्या वाहतुकीच्या दृष्टीने १३ शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार आहे.


औरंगाबाद : एस. टी. महामंडळाबरोबर प्रवासी वाहतूक सुविधा अधिकाधिक अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रवाशांच्या वाहतुकीच्या दृष्टीने १३ शहरांमध्ये बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. या १३ शहरांमध्ये मराठवाड्यातील नांदेड आणि औरंगाबाद शहरांचा समावेश आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली.
परिवहनमंत्री दिवाकर रावते हे सोमवारी शहरात आले असता त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. पर्यटनदृष्ट्या जागतिक पातळीवर नाव असलेल्या औरंगाबाद शहरात अनेक वर्षांपासून अद्ययावत बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाची पार दुरवस्था झालेली आहे; परंतु निधी मंजूर होऊनही अद्ययावत बसस्थानकाचे काम सुरू होत नाही. बसस्थानकाच्या अशा परिस्थितीविषयी रावते म्हणाले की, लवकरच १३ शहरांमध्ये बसपोर्ट बनविण्यात येणार आहे. यामध्ये नांदेड आणि औरंगाबादचा समावेश करण्यात आला असून, त्यास मंजुरीही मिळालेली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया निघेल.
आंतरराष्ट्रीय निविदा प्रक्रिया
बसपोर्टसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात ही निविदा प्रक्रिया काढली जाईल, असे रावते यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच एअरपोर्टच्या धर्तीवर औरंगाबादेत बसपोर्ट प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
अत्याधुनिक सुविधा
आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे विविध देशांमधील कंत्राटदार सहभागी होतील. त्यातून बसपोर्टमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी मूलभूतबरोबर अत्याधुनिक सुविधा राहणार आहेत. एटीएम मशीनपासून अन्य सुविधा देण्यात येतील. बसपोर्टमुळे दळणवळणाची सुविधा स्मार्ट होणार आहे.