मुजीब देवणीकर, औरंगाबादमहाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढत आहे. दरवर्षी सुमारे ४० लाख पर्यटक शहरात हजेरी लावत आहेत. पर्यटकांची संख्या आणखी वाढावी या दृष्टीने राज्य पुरातत्व विभाग, पर्यटन विकास महामंडळही जोरदार प्रयत्न करीत आहे. वेरूळ व अजिंठ्याची शिल्पे, देवगिरीचा किल्ला, दक्षिणेचा बीबी का मकबरा, जुनी पाणचक्की, वेरूळचे घृष्णेश्वर मंदिर, थंड हवेचे ठिकाण म्हैसमाळ, शूलिभंजन पर्वत, पैठणचे तीर्थक्षेत्र, जायकवाडी धरण, वृंदावन गार्डनच्या धर्तीवरील ज्ञानेश्वर उद्यान, अशी एक ना अनेक ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणे पाहण्यासाठी देश व विदेशातील पर्यटक औरंगाबादला येत आहेत.गेल्या वर्षात येथील ऐतिहासिक स्थळांना ३९ लाख ५१ हजार ५२ पर्यटकांनी भेट दिली. यात ३८ लाख ७४ हजार ५३६ देशी, तर ७६ हजार ५१६ पर्यटक विदेशी होते, अशी माहिती पुरातत्व विभागाने दिली. २०१२-२०१३ या वर्षी ४४ लाख ९ हजार ९७८ पर्यटक आले होते. तिकीट विक्रीतून ५ कोटी ५० लाख १४ हजार ७९० रुपये मिळाले. २०१३-२०१४ या वर्षात ४ लाख ३८ हजार ४९८ देशी व २० हजार ४२८ विदेशी पर्यटक कमी आले. त्यामुळे पुरातत्व विभागाचे उत्पन्न सव्वाकोटीने घटून ४ कोटी ३६ लाख ११ हजार ६९५ रुपये मिळाले. गेल्या ९ वर्षांत जिल्ह्यास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेतली, तर २०१२-२०१३ मध्ये पर्यटकांच्या संख्येने उच्चांक गाठला.वेरूळ लेणी नंबर-१भारतीय स्थापत्य कलेचा अजोड नमुना म्हणून वेरूळच्या लेणीला गेल्या वर्षभरात १३ लाख ४१ हजार ४८२ देशी, तर २८ हजार ८३२ विदेशी पर्यटकांनी भेट दिली. वर्षभरात आलेल्या एकूण पर्यटकांपैकी सर्वाधिक पर्यटकांनी वेरूळ लेणीला भेट देऊन नंबर वन ठरविले. मात्र, गेल्या वर्षी वेरूळला येणाऱ्या पर्यटकांची संख्या १,८५,२३५ ने घटली आहे. ९५ कोटींचे व्हिजिटर्स सेंटर अजिंठा-वेरूळ विकास प्रकल्पांतर्गत जपान सरकारच्या आर्थिक साह्याने तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करून दोन व्हिजिटर्स सेंटर उभारण्यात आले आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे अभ्यागत केंद्र आहेत. अजिंठा-वेरूळ जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र असून, येथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला लेण्यांचे महत्त्व कळावे या दृष्टीने व्हिजिटर्स सेंटर उभारण्याची संकल्पना समोर आली. तब्बल ९५ कोटी रुपये खर्च करून हे केंद्र उभारण्यात आले आहेत. ५५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या केंद्रात अजिंठ्यातील १, २, १६ आणि १७ क्रमांकाच्या लेण्यांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. पर्यटकांना लेण्यांबद्दल इत्थंभूत माहिती येथे मिळेल. वेरूळ येथे ४० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या केंद्रातही लेणी क्रमांक १६ ची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. ६० हॅण्डिक्राफ्ट दुकानांसाठी स्वतंत्र गाळे, एमपीथ्री थिएटर, इकोफ्रेंडली बिल्डिंग, बिदरी, हिमरू, पैठणी, कारपेट या प्रसिद्ध मालासाठी स्वतंत्र शोरूम उपलब्ध आहेत. वेरूळ लेण्यांसमोरच हे केंद्र उभारले आहे.
टुरिझम हबच्या वाटेवर औरंगाबाद
By admin | Updated: August 27, 2014 00:14 IST
मुजीब देवणीकर, औरंगाबाद महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात पर्यटकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत वाढत आहे.
टुरिझम हबच्या वाटेवर औरंगाबाद
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}