शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत एमआयएम, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:59 IST

पाण्याच्या डबक्यात पडून मुलगा दगावल्यानंतर बायजीपुºयात एमआयएम नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते काल सोमवारी समोरासमोर भिडले. या हाणामारीत एमआयएम नगरसेवक जफर बिल्डरसह तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. जिन्सी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि दंगलीचे गुन्हे दाखल करून मंगळवारी चौघांना अटक केली. चौघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पाण्याच्या डबक्यात पडून मुलगा दगावल्यानंतर बायजीपुºयात एमआयएम नगरसेवक आणि राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते काल सोमवारी समोरासमोर भिडले. या हाणामारीत एमआयएम नगरसेवक जफर बिल्डरसह तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. जिन्सी पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध प्राणघातक हल्ला आणि दंगलीचे गुन्हे दाखल करून मंगळवारी चौघांना अटक केली. चौघांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिघांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.बायजीपुरा भागात दोन दिवसांपूर्वी एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यू पाण्याच्या डबक्यात पडून झाला होता. या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता सलीम पटेल बोरगावकर याने फेसबुकवर बदनामी सुरू केल्याच्या संशयाचे पर्यवसान हाणामारीत झाले. एमआयएमचा नगरसेवक जफर बिल्डर याचा भाऊ अफसर हा गल्लीत उभा असताना सलीम पटेल समर्थकांनी अफसरवर हल्ला केला. त्या मारहाणीत त्याचे डोके फुटले. अन्य एकजण गंभीर जखमी झाला. हे कळताच नगरसेवक जफर बिल्डर व त्याच्या भावांनीही समर्थकांसह धाव घेतली. जफर बिल्डर व त्याच्या समर्थकांनीही सलीम पटेल यास घरासमोर अडवून लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. यात सलीम पटेलसह मोबीन हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारींवरून नगरसेवक जफर बिल्डरसह त्याचा भाऊ अथहर, बाबर, अफसर, सलीम पटेल यांच्यासह १५ जणांविरुद्ध प्राणघातक हल्ला करणे दंगल घडवणे, मारहाण करून जखमी करणे अशा कलमांन्वये गुन्हा दाखल केला.