स्मार्टच्या स्पर्धेतून औरंगाबाद बाद होण्याची चिन्हे

By Admin | Updated: November 17, 2015 00:33 IST2015-11-17T00:25:31+5:302015-11-17T00:33:05+5:30

औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे स्मार्ट सिटी अभियानात शहराची पहिल्या वर्षी निवड होण्याची संधी हुकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Aurangabad marks the emergence of smart competition from Aurangabad | स्मार्टच्या स्पर्धेतून औरंगाबाद बाद होण्याची चिन्हे

स्मार्टच्या स्पर्धेतून औरंगाबाद बाद होण्याची चिन्हे


औरंगाबाद : महानगरपालिकेच्या दिरंगाईमुळे स्मार्ट सिटी अभियानात शहराची पहिल्या वर्षी निवड होण्याची संधी हुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. पहिल्या २० शहरांच्या यादीत निवड व्हावी यासाठी राज्यातील इतर शहरांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर दुसरीकडे अहवाल सादर करण्यासाठीची मुदत १३ दिवसांवर येऊन ठेपली तरी औरंगाबाद मनपाने अद्याप विकासाचे मॉडेलच ठरविलेले नाही. त्यामुळे राहिलेल्या मुदतीत अहवाल तयार करणे आणि केला तरी तो इतर शहरांच्या स्पर्धेत टिकणे अवघड असल्याचे मत व्यक्त होत आहे.
देशातील निवडक शहरांचा दर्जा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी असे स्मार्ट सिटी अभियान सुरू केले आहे. या अभियानाकरिता सरकारने औरंगाबादसह देशभरातील शंभर शहरांची निवड केली आहे. आता यातून दुसऱ्या फेरीत यंदा २० शहरे निवडण्यात येणार आहेत. ही निवड झाल्यानंतर केंद्र सरकारकडून विकासकामांसाठी भरघोस निधी मिळणार आहे. त्यामुळे सर्वच शहरांनी पहिल्या २० शहरांच्या यादीत निवड होण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ही निवड या शहरांच्या प्रकल्प अहवालांवरून होणार आहे. हे प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम पीएमसीमार्फत केले जात असून, त्यासाठी शासनाने ९० दिवसांची मुदत दिलेली आहे. ही मुदत २९ नाव्हेंबर रोजी संपत आहे. ही मुदत संपण्यासाठी अवघे १३ दिवसच शिल्लक राहिले आहेत. परंतु अद्याप मनपाने स्मार्ट सिटीत नविनीकरण,

Web Title: Aurangabad marks the emergence of smart competition from Aurangabad