राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 00:42 IST2017-12-01T00:41:34+5:302017-12-01T00:42:28+5:30

मुंबई येथे १ ते ३ डिसेंबरदरम्यान होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे. हा संघ गरवारे कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या निवड चाचणीतून निवडण्यात आला.

 Aurangabad district team leaves for state-level karate competition | राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना

औरंगाबाद : मुंबई येथे १ ते ३ डिसेंबरदरम्यान होणाºया राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ रवाना झाला आहे. हा संघ गरवारे कम्युनिटी सेंटर येथे झालेल्या निवड चाचणीतून निवडण्यात आला. निवडण्यात आलेला विविध वय व वजन गटातील संघ पुढीलप्रमाणे : योगिराज कदम, प्रारब्ध डबाले, कैवल्य लेहकर, विराज भालेकर, तनिष्क चिंतामणी, वेदांत लगामे, राजन खंडागळे, श्रेयस लेंभे, मांगल्य शिंदे, सुयश साळवे, रोशनी काकडे, अभिजित गवई, अथर्व मिरकर, संविधान म्हस्के, अंकिता श्रीखंडे, हरीश माळी, किरण खेत्रे, रत्नमाला लहाने, साक्षी गोरे, जया सूर्यवंशी, अनिकेत जाधव. या संघाला औरंगाबाद जिल्हा कराटे संघटनेचे सचिव सुरेश मिरकर, गरवारे कम्युनिटी सेंटरचे संचालक सुनील सुतावने, राहुल गाडीवान यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title:  Aurangabad district team leaves for state-level karate competition