शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गोल्डन ट्रँगलमध्ये येणार औरंगाबाद शहर

By admin | Updated: December 15, 2015 00:05 IST

विकास राऊत , औरंगाबाद दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी


विकास राऊत , औरंगाबाद
दिल्ली- मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी) नंतर औरंगाबाद शहर आणि मराठवाड्याला गोल्डन ट्रान्सपोर्ट ट्रँगलमध्ये आणण्यासाठी १२ हजार १४० कोटी रुपयांचा नॅशनल हायवे डेव्हलपमेंट प्रोग्राम (एनएचडीपी) तयार करण्यात आला असून, त्याचे भूमिपूजन २५ डिसेंबर रोजी केंद्रीय रस्ते, वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होत आहे. चिकलठाणा येथील केम्ब्रिज शाळेजवळ सायंकाळी ४ वा. होणाऱ्या या कार्यक्रमाला केंद्र व राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असतील.
१२ हजार कोटींचा राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग विकासाचा अंदाजे ८ हजार कोटींचा सीआरएफचा कार्यक्रम आहे. आगामी काही वर्षांत डीएमआयसी आणि एनएचडीपीमुळे मराठवाडा आणि औरंगाबाद शहर देशातील महत्त्वाचा विकसित भौगोलिक प्रदेश म्हणून पुढे येण्याची शक्यता आहे. यामुळे औरंगाबाद शहराला ऐतिहासिकेसोबतच ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सिटी म्हणूनही ओळख मिळू शकेल. देशभरात वाहतूक विकासासाठी ७-फेसचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्यातील ३ टप्पे पूर्ण झाले असून, चौथ्या टप्प्यात औरंगाबाद व सीआरएफ (सेंट्रल रोड फंड वर्क्स) च्या रस्ते विकासाला प्रारंभ होईल. सीआरएफमधील रस्ते राज्य बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात येतील, तर एनएचएआय (नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया) यांच्याकडे एनएचडीपीअंतर्गत निर्माण होणाऱ्या रस्त्यांचे नियंत्रण राहील, असे सूत्रांनी सांगितले.
जालना रोडचा समावेश रा.म.मध्ये
जालना रोड सध्या सहापदरी असून, त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. येडशी ते औरंगाबाद ते धुळे महामार्गाच्या कामातच ९ कि़ मी. अंतराच्या जालना रोडचे काँक्रिटीकरण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र.२११ औरंगाबाद शहर चौपदरीकरण येडशी ते औरंगाबाद ते धुळे आणि इतर रस्त्यांचे एकत्रित भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.