शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनधारकांनो लक्ष द्या ! अनपेड चालानचा तात्काळ भरणा करा अन्यथा कोर्टात हजर रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 13:35 IST

वाहतूक नियम मोडणारे वाहनचालक ई- चालानची तडजोड रक्कम भरण्यास तयार नसतात. अशा वाहनचालकांचे चालान अनपेड या शीर्षाखाली प्रलंबित असते.

ठळक मुद्देवाहतूक नियम मोडणाऱ्या १७ हजार २६१ नागरिकांना मेसेजद्वारे इशारा

औरंगाबाद : वाहतूक नियम मोडून वाहने पळविणाऱ्या १७ हजार २६१ वाहनचालकांना ‘एसएमएस’द्वारे २४ सप्टेंबरपर्यंत ई-चालान रकमेचा भरणा करावा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर राहावे, असे निर्देश वाहतूक पोलीस प्रशासनाने दिले आहेत. एवढेच नव्हे, तर ई-चालान भरण्यासाठी विविध पर्यायही उपलब्ध केले आहेत.

वाहतूक नियम मोडणारे वाहनचालक ई- चालानची तडजोड रक्कम भरण्यास तयार नसतात. अशा वाहनचालकांचे चालान अनपेड या शीर्षाखाली प्रलंबित असते. अशा अनपेड चालान असलेल्या वाहनचालकांनी कारवाईनंतर काही दिवसांत तडजोड रक्कम जमा करणे आवश्यक असते. मात्र, शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केलेल्या १७ हजार २६१ वाहनचालकांनी ई-चालानची रक्कम जमा केली नसल्याची बाब समोर आली आहे. अशा वाहनचालकांना अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाकडून वारंवार मेसेज पाठविण्यात आले आहेत. यानंतरही त्यांनी चालानची रक्कम जमा न केल्याने शेवटी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला भरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. शेवटी या वाहनचालकांना एक संधी म्हणून २४ सप्टेंबरपर्यंत चालानची रक्कम जमा करा, अन्यथा २५ सप्टेंबर रोजी लोकअदालतीमध्ये हजर रहा, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कुठे आणि कसे भरता येईल ई-चालानशहर, छावणी, सिडको, वाळूज, वाहतूक शाखा निरीक्षक कार्यालयात किंवा विविध चौकात तैनात असलेले वाहतूक हवालदार यांच्याकडे रोखीने ई-चालानची रक्कम जमा करता येईल. यासोबतच डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम ॲपद्वारे, ई-चालानवर जाऊन दंडाची रक्कम भरता येईल. महाट्रॅफिक ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून भरणा करावा किंंवा संकेतस्थळावरही दंड भरता येतो.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCourtन्यायालय