शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

By admin | Updated: June 15, 2014 00:35 IST

गोकुळ भवरे, किनवट बंजारा आणि आदिवासी मतदारांचे प्राबल्य असलेल्या किनवट विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय विरोधक कोणती रणनीती आखतात,

गोकुळ भवरे, किनवटबंजारा आणि आदिवासी मतदारांचे प्राबल्य असलेल्या किनवट विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय विरोधक कोणती रणनीती आखतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह नसला तरीही पक्षाच्या उमेदवाराला भाजप-शिवसेना, इतर पक्षातील विरोधक एक होणार नाहीत यासाठी आ. प्रदीप नाईक यांना नवे डावपेच खेळावे लागतील, असे सध्याचे चित्र आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या उमेदवाराला निर्णायक मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेला आमदार नाईकांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणला मैदानात उतरवतील, असे वाटत नाही. आ. नाईक विजयाच्या हॅट्ट्रीकवर आहेत.या मतदारसंघाच्या इतिहासात एकाही उमेदवाराने हॅट्ट्रीक साधली नाही. कै. उत्तमराव राठोड, कै. किशनराव पाचपुते व डी. बी. पाटील यांनी प्रत्येकी दोनवेळा प्रतिनिधित्व केले. या रांगेत आता प्रदीप नाईक यांचे नाव लागले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार, आदिवासी नेते भीमराव केराम यांनी भाजपाच्या तिकिटावर प्रदीप नाईक यांना तुल्यबळ लढत दिली होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आ. नाईक यांच्यासमवेत केराम अग्रेसर होते. या मतदारसंघात बंजारा विरुद्ध आदिवासी अशी नेहमीच लढत होत आली आहे. त्यात दलित, मुस्लिम मते निर्णायक भूमिका बजावतात. दलित, मुस्लिमांची मते मिळविणारा हमखास यशस्वी होतो, असा इतिहास आहे. बंजारा समाजाचे प्रदीप नाईक व आदिवासी नेते भीमराव केराम सध्यातरी एकत्र असल्याने आगामी काळात राजकीय पटलावर काय व कशी उलथापालथ होईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षाला गत पाच वर्षांत डोळ्यात भरेल असे आंदोलन छेडण्यात यश आले नाही. भाजपाकडे उमेदवार कोण असावा, याचीच चर्चा आहे. धरमसिंग राठोड, नगरसेवक दिनकर चाडावार, संघटनमंत्री सुधाकर भोयर, शिवसेनेकडून डॉ. बी. डी. चव्हाण, ज्योतिबा खराटे हे इच्छुक आहेत. अपक्ष किंवा इतर पक्षाकडून तिकीट मिळवून माजी नगराध्यक्ष इसा खान, प्रफुल्ल राठोड, असद खान किनवटकर, मनसेकडून धनलाल पवार, माकपकडून कॉ. अर्जुन आडे, भाकपकडून गंगारेड्डी बैनमवाड आदींची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. विरोधकांची खेळी काय असेल, यावरच बरेच काही अवलंबून आहे. राष्ट्रवादीशी लढण्यासाठी खरोखरच सर्वच विरोधी पक्षांनी एका बाकावर बसून सर्व शक्तिनिशी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विजयाच्या निर्धाराचीही धार असावी लागणार आहे. नुसता निर्णय घेणेही धोक्याची घंटा वाजवेल, अशी चर्चा राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे. भाजपा भीमराव केराम ५१४८३भाकप कॉ. अर्जुन आडे १२६०० राष्ट्रवादी काँग्रेस प्रदीप नाइक ६९६४५इच्छुकांचे नाव पक्षप्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस धरमसिंग राठोड भाजपाज्योतिबा खराटे शिवसेनाबी. डी. चव्हाण शिवसेनालोकसभा निवडणुकीत राजीव सातव (कॉंग्रेस) यांना २०३२ एवढे मताधिक्य