शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

कमी टक्क्यांच्या केंद्रांवर लक्ष

By admin | Updated: September 14, 2014 00:22 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील जनजागृती विभागाने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या जिल्ह्यातील १२७ मतदान केंद्रांवर या विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी संबंधित ठिकाणी ग्रामसभा आणि वॉर्ड बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघांत जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी आयोगाकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मतदारांत जागृती निर्माण करण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर स्वीप सेलची स्थापना करण्यात आली आहे. औरंगाबादेत स्वीप सेलची धुरा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर यावेळी मतदानाचा टक्का वाढविण्याचा या सेलचा प्रयत्न आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय अशा मतदान केंद्रांची यादी तयार करून तेथे ग्रामीण भागात ग्रामसभा आणि शहरात वॉर्ड बैठका घेण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या केंद्रांमध्ये सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे ही वैजापूर विधानसभा मतदारसंघात आहेत, तर सर्वात कमी मतदान झालेले १ मतदान केंद्र हे सिल्लोड मतदारसंघात आहे. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ९ तालुक्यांमध्ये २६३० मतदान केंद्रे होती. त्यापैकी १२७ मतदान केंद्रांवर पन्नास टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेले आहे. या सर्व मतदान केंद्रांवर यावेळी निश्चितपणे शंभर टक्के मतदान करण्याचा प्रयत्न असल्याचे वासुदेव सोळंके यांनी सांगितले.