शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

By Admin | Updated: August 9, 2015 00:27 IST2015-08-09T00:23:51+5:302015-08-09T00:27:57+5:30

शिराढोण : कळंब तालुक्यातील लोहटा पूर्व येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीवर तीस वर्षीय इसमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

The attempt of atrocities against a school girl | शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

शाळकरी मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न


शिराढोण : कळंब तालुक्यातील लोहटा पूर्व येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीवर तीस वर्षीय इसमाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात संबंधिताविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, लोहटा पूर्व येथील पंधरा वर्षीय मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी आली असता ती एकटीच पाहून गावातीलच पप्पू उर्फ अविनाश दगडू टिंगरे यांने अचानक घरात प्रवेश करून दरवाजा आतून बंद करून अत्याचाराचा प्रयत्न केला. या प्रकरणी पप्पू उर्फ अविनाश दगडू टिंगरे याच्याविरूद्ध शिराढोण ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. प्रिती टिपरे या करीत आहेत.(वार्ताहर)

Web Title: The attempt of atrocities against a school girl