'एटीएस'ची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी महिलांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:15 IST2026-03-02T17:10:41+5:302026-03-02T17:15:01+5:30

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा बांगलादेशी घुसखोर सापडले! सातारा परिसरात 'एटीएस'चा छापा

ATS Crackdown in Chhatrapati Sambhajinagar: Two Bangladeshi Women Arrested; Case Filed Against Landlord for Not Informing Police | 'एटीएस'ची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी महिलांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल

'एटीएस'ची मोठी कारवाई; दोन बांगलादेशी महिलांना आश्रय देणाऱ्या घरमालकावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : सातारा परिसरातील अलोकनगरात राहणाऱ्या दोन बांगलादेशी महिलांना दहशतवादविरोधी शाखेने पकडले आहे. या महिलांची माहिती पोलिस ठाण्यास कळविली नसल्यामुळे घरमालकाच्या विरोधात सातारा ठाण्यात २८ फेब्रुवारीला गुन्हा नोंदविण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी सातारा ठाण्याच्याच हद्दीतील एका हॉटेलमधून बांगलादेशी महिलांना पकडण्यात आले होते.

गुन्हा दाखल झालेल्या घरमालकाचे विनोद कडूबाळ करमासे (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, फ्लॅट क्र १९, मूळ रा. वाळूज) असे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक जगन्नाथ मेनकुदळे यांना सातारा परिसरात बांगलादेशी महिला वास्तव करत असल्याची माहिती मिळाली होती. ती माहिती त्यांनी दहशतवादविरोधी पथकाला दिली. त्यानंतर मेनकुदळे यांनी एपीआय अनिल कंकाळ यांच्या पथकासह करमासे याच्या घरी छापा मारला. 

तपासणीत करमासे याने फ्लॅटच्या बेडरूममध्ये दोन बांगलादेशी महिलांना ठेवल्याचे समोर आले. एक ३९ तर दुसरी १९ वर्षीय अशा दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली त्यानंतर दोघींची गुन्हे शाखेचे उपायुक्त यांनी हद्दपार प्रक्रिया सुरू केली आहे. तर करमासे याच्याविरुद्ध सातारा ठाण्यात एपीआय अनिल कंकाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : एटीएस की बड़ी कार्रवाई: दो बांग्लादेशी महिलाओं को आश्रय देने पर मकान मालिक पर मामला दर्ज

Web Summary : एटीएस ने छत्रपति संभाजीनगर में दो बांग्लादेशी महिलाओं को गिरफ्तार किया। मकान मालिक विनोद करमासे पर पुलिस को सूचित करने में विफल रहने का आरोप है। उसने महिलाओं को अपने फ्लैट में रखा था। पुलिस ने निर्वासन प्रक्रिया शुरू की और करमासे के खिलाफ मामला दर्ज किया।

Web Title : ATS Action: Landlord Booked for Sheltering Two Bangladeshi Women

Web Summary : ATS arrested two Bangladeshi women in Chhatrapati Sambhajinagar. The landlord, Vinod Karmase, faces charges for failing to report them to the police. He housed the women in his flat. Police initiated deportation process and filed a case against Karmase.