शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हाल

By admin | Updated: May 23, 2015 00:40 IST

पुरुषोत्तम करवा , माजलगाव जून महिन्यात अधिक मासाचा महिना येत आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असताना मंदिर

पुरुषोत्तम करवा , माजलगावजून महिन्यात अधिक मासाचा महिना येत आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असताना मंदिर व रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. प्रशासनाचे मात्र याकडे अद्यापही दुर्लक्षच आहे. तीन वर्षांनंतर एकदा अधिक मासाचा महिना येतो. यावर्षी १७ जून रोजी अधिक मासाला सुरुवात होत आहे. तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर आहे. या महिन्यात पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे अधिक महत्त्व असते. भारतात दोन ठिकाणी पुरुषोत्तमाचे मंदिर आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेशातून भाविक दर्शनासाठी पुरुषोत्तमपुरीत गर्दी करीत असतात. भाविकांच्या गर्दीमुळे व्यापाऱ्यांसह छोट्या-मोठ्या दुकानदारांची गर्दी असते. याचा फायदा ग्रा.पं.ला होतो. मात्र ग्रामपंचायतच्या वतीने मंदिराच्या दुरुस्तीसाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.दोन वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी भेट देऊन या ठिकाणचा विकास आराखडा तयार करुन यावर १३ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला होता. हा प्रस्ताव शासनाकडे पाठविला, मात्र हा प्रस्ताव लालफितीत अडकलेला आहे. अधिक मास पंधरा-वीस दिवसांवर आलेला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची साधी डागडुजीही केलेली नाही. सध्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असून, भाविकांचे हाल होत आहेत.मंदिराचीही दुरवस्था झालेली असून, अनेक ठिकाणी ते पडले आहेत. पुरात असलेल्या या मंदिराची खूपच दुरवस्था झालेली आहे. येथील ग्रा.पं.कडे मंदिर दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध नसल्याने खर्च करू शकले नाहीत. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन दुरुस्तीची मागणी भाविकांमधून होत आहे. सध्या मंदिर व रस्त्याची दुरवस्था झाली असली तरी याच्या दुरुस्तीसाठी ग्रा.पं.कडे निधी नाही. प्रशासनाकडे मागणी केली, असल्याचे सरपंच शालिनी गोळेकर यांनी सांगितले.