शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIDMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
2
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
3
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
4
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
5
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
6
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
7
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
8
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
9
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
10
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
11
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
12
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
13
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
14
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
15
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
16
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
17
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
18
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
19
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
20
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
Daily Top 2Weekly Top 5

उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले

By admin | Updated: May 18, 2014 00:38 IST

विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे.

विठ्ठल भिसे, पाथरी यावर्षी पाथरी तालुक्यात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले. यामुळे आगामी गळीत हंगामामध्ये ऊस गाळपासाठी या भागातील दोन्ही खाजगी कारखाने सुरू होणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांमध्ये कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने आतापासूनच चिंता वाढू लागली आहे. पाथरी तालुका हा सिंचनाचा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जायकवाडीचा डावा कालवा आणि गोदावरी पात्रातील बंधारे या भागातील शेतकर्‍यांचा कल ऊस लागवडीकडे आहे. मागील काही वर्षात ऊस उत्पादक शेतकर्‍यांना ऊस गाळपासाठी नाहक त्रास सहन करावा लागलेला आहे. तरी या भागातील ऊस उत्पादक शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. गतवर्षी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू झाला नाही. लिंबा येथील योगेश्वरी शुगर कारखान्याने जेमतेम गाळप केले. गतवर्षी या भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी बाहेरी कारखान्यांनी नेला. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने आणि बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकर्‍यांनी महागडी उसाची बियाणे खरेदी करून ऊस लागवड केली आहे. दोन्ही कारखाना कार्यक्षेत्रात ५ लाख मे.टना पेक्षा अधिक ऊस उपलब्ध आहे. हे दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने ऊस गाळप करू शकले तरी या भागात ऊस शिल्लक राहणार आहे. यामुळे कारखाने यावर्षी वेळेच्या आत सुरू होणे आवश्यक आहे. सुरुवातीपासूनच या भागातील शेतकरी पाथरी येथील रेणुका शुगर कारखाना सुरू होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू लागले आहेत. कारखाना व्यवस्थापन आणि प्रशासनातील वाद वेळेच्या आत मिटवून कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल, अशी अपेक्षाही व्यक्त होऊ लागली आहे. बाहेरील कारखाने कानाडोळा करणार गतवर्षी जिल्ह्यात तसेच जिल्हा बाहेर उसाचे क्षेत्र कमी होते. यामुळे बाहेरील जिल्ह्यातील कारखान्यांनी या भागातील शेतकर्‍यांचा ऊस गाळपास नेला आहे. यावर्षी सर्वच ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढल्यामुळे बाहेरील कारखाने या भागातील शेतकर्‍यांकडे कानाडोळा करणार असल्याचे दिसत आहे. गतवर्षी प्रमाणे याहीवर्षी या कारखान्यांनी आपला ऊस गाळपास न्यावा, अशी भावना या भागातील शेतकरी ठेऊन आहे. तालुक्यात बहुतांश उसाचे क्षेत्र १० ते १५ कि.मी.च्या आत आहे.यामुळे या भागातील ऊस बैलगाडी कार्यक्षेत्रातील आहे. रेणुका शुगर कारखान्याला गाळपासाठी वाहनाऐवजी बैलगाडीची यंत्रणा लागत असल्याने उसाची वाहतूकही कमी खर्चात होते. आणि शेतकर्‍यांचा उसही वेळेच्या आत जातो. यामुळे रेणुका शुगर कारखाना सुर होणे शेतकर्‍यांच्या हिताचे आहे आणि आतापासून शेतकर्‍यांचा रेटा कारखाना सुरू होण्यासाठी वाढू लागला आहे.