आपले दान सत्पात्री गेलेय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:05 IST2021-07-09T04:05:46+5:302021-07-09T04:05:46+5:30

१) कळकळत्या उन्हात तापलेल्या तवारूपी सिमेंट रस्त्यावर अनवाणी पायांनी ती चिमुरडी उभी असते. आपल्या डोळ्याला डोळा भिडवताना, तिची ...

Are your donations gone? | आपले दान सत्पात्री गेलेय का?

आपले दान सत्पात्री गेलेय का?

१) कळकळत्या उन्हात तापलेल्या तवारूपी सिमेंट रस्त्यावर अनवाणी पायांनी ती चिमुरडी उभी असते. आपल्या डोळ्याला डोळा भिडवताना, तिची याचनेची नजर क्षणात तुमच्या मनात दातृत्वाचे भाव निर्माण करतात. तुम्ही खिशातून काही तरी तिच्या हातात टाकता व कुणाला तरी मदत केल्याचे समाधान मानून पुढे निघता.

२) आपले दान सत्पात्री गेलेय का? याची आपण शहानिशा करत नाही. पण आपल्या मेहनतीच्या पैशावर भीक मागण्याचा व्यवसाय पोसला जातोय, याची तुम्हाला काही खबर आहे का? दिवसभरात जमा झालेल्या गल्ल्याची अशी एकत्रित येऊन वाटणी होते.

३) भीक देणारे तुम्ही शेअरिंग रिक्षामधून घर गाठता व दिवसभर याचकाच्या भूमिकेत दिसणारे भिकारी चक्क मीटर रिक्षात बसून ऐटीत तेथून निघून जातात.

४) दिवसभर श्रमलेला हा भिकारी दारूचे दुकान गाठतो व एक बाटली घेऊन आनंदाने श्रमपरिहार करायला निघतो.

Web Title: Are your donations gone?