शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागरी दलित वस्ती पाणीपुरवठ्यासाठी ३२ लाखांच्या निधीला बैठकीत मंजुरी

By admin | Updated: October 15, 2016 01:16 IST

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीसाठी सभापती आशाताई वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरी दलितवस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीसाठी सभापती आशाताई वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत २०१६-१७ साठी ३२ लाखांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. मनपाच्या वतीने नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणीसाठी सभापती आशाताई वायवळ यांच्या अध्यक्षतेखाली १४ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वायवळ यांनी सन २०१६-१७ साठी नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा याबाबत बैठकीत विषय मांडला. या विषयावर अतुल सरोदे, कस्तुराबाई कांबळे, सचिन कांबळे यांनी अनुमोदन देऊन ३२ लाख रुपये खर्च मान्यता देऊन शासनाकडे पाठविण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावामध्ये नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा प्रकल्प अंमलबजावणी या समितीचे सदस्य यांच्या सूचनेनुसार १ लाख रुपये निधी देण्याचे ठरले. या निधीतून आवश्यक वस्तंूची पूर्तता करण्यासाठी कामे करण्यात येतील, अशा सूचना देण्यात आल्या. तसेच शहरातील समाजमंदिर परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी नळ कनेक्शन देणे व १ हजार लिटर पाण्याची टाकी देण्यात यावी, तसेच नळाला अर्धा इंची मोटार बसविण्याचे आदेश देण्यात आले. समाजकल्याण सभापती सचिन कांबळे, आकाश लहाने, राहुल साळवे, पंकज खेडकर यांनी अनुमोदन दिले. गटनेते अतुल सरोदे यांनी शहरातील जलकुंभ या ठिकाणी लेआऊट व्हॉल्व्ह बसविण्याच्या सूचना केल्या. बैठकीस नगरसचिव चंद्रकांत पवार, प्रभारी शहर अभियंता वसीम पठाण, सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.