शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
2
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
3
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
4
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
5
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
6
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
7
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
8
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
9
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
10
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
11
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
12
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
13
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
14
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
15
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
16
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
17
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
18
'जनता माफ करणार नाही', पंतप्रधान मोदींचा चहा विकतानाच्या एआय व्हिडिओवरुन भाजपची जोरदार टीका
19
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
Daily Top 2Weekly Top 5

बोगस 'IAS' कल्पनाचा आणखी एक कारनामा; आर्थिक व्यवहारात ठाकरेसेनेच्या खासदाराचे नाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:37 IST

पंचतारांकित हॉटेलमधील हायप्रोफाईल महिलेच्या खात्यात खासदार नागेश पाटील आष्टीकरांकडून १ लाख ४५ हजार रुपये जमा

छत्रपती संभाजीनगर: शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये सहा महिन्यांपासून मुक्कामी असलेल्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणाऱ्या बोगस आयएएस अधिकारी कल्पना भागवत या महिलेच्या 'पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन'मुळे खळबळ उडाली असतानाच, या प्रकरणात आता ठाकरे सेनेचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे नाव समोर आले आहे. या महिलेच्या बँक खात्यात पैसे जमा करणाऱ्या ११ जणांच्या यादीत खासदार आष्टीकर यांचा समावेश असून, त्यांनी महिलेला एक लाख ४५ हजार रुपये दिल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

नेमके प्रकरण काय?कल्पना भागवत हिला बनावट कागदपत्रांच्या आधारे हॉटेलमध्ये मुक्काम केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. तिच्या अटकेनंतर तिच्या खात्यातील आर्थिक व्यवहारांची तपासणी केली असता तिचे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील नागरिकांशी तसेच अफगाण प्रियकराशी संबंध असल्याचे उघड झाले. तिच्या खात्यात विविध स्रोतांतून ३२ लाख ६८ हजार ८६२ एवढी मोठी रक्कम जमा झाल्याचे पोलिसांच्या रिमांड अर्जात नमूद आहे.

खासदारांकडून 'माणुसकी'च्या नात्याने मदतपोलिसांना तपासामध्ये कल्पना भागवत हिला पैसे देणाऱ्यांमध्ये खासदारांचे नाव आढळले. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी या महिलेला वेगवेगळ्या वेळी एक लाख ४५ हजार रुपये दिल्याचे मान्य केले आहे. खासदार आष्टीकर यांनी स्पष्ट केले की, कल्पना भागवतने त्यांना राम भद्राचार्य महाराज यांची भक्त असल्याचे सांगत संपर्क केला होता. तिने आयएएससाठी निवड झाली पण वडील वारल्याने ट्रेनिंगला जाता आले नाही, आई आजारी आहे, अपघात झाला किंवा मंदिर बांधायचे आहे अशी वेगवेगळी कारणे सांगून सहानुभूती मिळवली. त्यांनी ही रक्कम 'कोणीतरी मदत मागितली म्हणून केवळ माणुसकीच्या नात्याने' दिल्याचे सांगितले. रक्कम मोठी नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

व्यवहार की माणुसकी गूढ कायम!कल्पना भागवत हिच्या खात्यात पैसे देणाऱ्यांमध्ये अफगाणिस्तानातील व्यक्ती अशरफ खिल (२ लाख ३१ हजार रुपये) सह सुंदर हरी उर्फ सुरेश जैन, अभिजीत क्षीरसागर, दत्तात्रय शेटे (७ लाख ८५ हजार रुपये) आणि रमेश मुळे यांसारख्या अन्य व्यक्तींचाही समावेश आहे. या महिलेचे विदेशी नागरिकांशी आणि त्यांच्या पारपत्रांशी संबंधित व्यवहार असल्याने, या व्यवहारामागील नेमके कारण काय होते, तसेच हे व्यवहार कोणत्या कारणांसाठी होते, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे कोठडीची मागणी केली होती. या हायप्रोफाईल गुन्ह्यात थेट खासदारांचे नाव आल्याने तपासाची व्याप्ती वाढणार असून, पैसे देणाऱ्या अन्य व्यक्तींचीही चौकशी होऊ शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bogus IAS' Deeds: MP's Name Surfaces in Financial Dealings

Web Summary : Fake IAS Kalpana Bhagwat's financial dealings reveal links to a Shiv Sena MP who allegedly gave her ₹1.45 lakh. She claimed to be a devotee needing help. Police investigate foreign transactions.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHingoliहिंगोली