शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्पी थिअटर लोकार्पणासाठी सज्ज

By admin | Updated: May 14, 2014 23:59 IST

भारत दाढेल, नांदेड पाश्चात्य देशातील सांस्कृतिक सभागृहाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने नगीनाघाट येथे उभारलेल्या अ‍ॅम्पी थिअटरचे काम पूर्ण झाले

अ‍ॅम्पी थिअटर लोकार्पणासाठी सज्ज भारत दाढेल ल्ल नांदेड पाश्चात्य देशातील सांस्कृतिक सभागृहाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने नगीनाघाट येथे उभारलेल्या अ‍ॅम्पी थिअटरचे काम पूर्ण झाले असून लोकार्पणासाठी ते सज्ज झाले आहे़ मागील दोन वर्षांपासून रसिकांना या थिअटरची प्रतीक्षा होती़ सांस्कृतिक सभागृहाची वेगळी संकल्पना असलेल्या अ‍ॅम्पी थिअटरसाठी जेएनएनयुआरएम योजनेतंर्गत १ कोटी ३० लाख रूपये निधी खर्च करण्यात आला आहे़ प्रारंभी एकात्मिक शहर विकास योजनेतंर्गत नदीघाटावर अ‍ॅम्पी थिअटरसाठी ९२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता़ दरम्यान, गुरू- त्ता - गद्दी त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त शहराला कोट्यवधींचा निधी मिळाला़ तसेच जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान योजनेतही या शहराची निवड झाली़ त्यामुळे विकासाची कामे मोठ्या प्रमाणात झाली़ शहरातील गोदावरी नदीवर असलेल्या विविध घाटांचे सुशोभिकरण करण्याचे काम करण्यात आले़ त्यामुळे या परिसराला सौदर्यंप्राप्त झाले़ विकास आराखड्यात नगीनाघाट येथील सुशोभित घाटाच्या पायथ्याशी सांस्कृतिक सभागृह करण्याचे निश्चित झाले होते़ एकात्मिक शहर विकास या मूळ योजनेतील अ‍ॅम्पी थिअटरचा प्रस्ताव नंतर जेएनएनयुआरएममध्ये स्थलांतरित झाला़ या योजनेतील निधी अ‍ॅम्पी थिअटरसाठी वळती करण्यात आला़ विकासाची कामे टप्याटप्प्याने होत असल्याने अ‍ॅम्पी थिअटरचे काम उशिरा सुरू झाले़ २०१२ मध्ये या कामाला कार्यारंभादेश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला २०१३ मध्ये सुरूवात झाली़ सहा महिन्यांत या थिअटरचे काम पूर्ण करण्यात आले़ सध्या रंगरंगोटीचे काम पूर्ण होवून थिअटर उदघाटनासाठी सज्ज झाले आहे़ यासंदर्भात मनपाचे शहर अभियंता गिरीश कदम म्हणाले, अ‍ॅम्पी थिअटरचे काम पूर्ण झाले असून लवकरच ते सर्वांसाठी उपलब्ध होईल़ ८०० रसिकांची क्षमता असलेल्या या अ‍ॅम्पी थिअटरमुळे नदीघाटावर मोकळ्या वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी नांदेडकरांना मिळणार आहे़ या मंचावर कला सादरीकरणासाठी सर्वांना संधी मिळणार आहे़ नांदेडच्या सौदर्यांत भर टाकणार्‍या अ‍ॅम्पी थिअटरमुळे सांस्कृतिक क्षेत्राची वेगळी ओळख निर्माण होणार आहे़ शहराला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे़ कलामंदिर, डॉ़ शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, कुसूम सभागृह या मोजक्या बंदिस्त सभागृहानंतर आता प्रथमच मोकळ्या वातावरणात या भव्य मंचाची निर्मिती होत आहे़ त्यामुळे कलारसिकांसाठी अ‍ॅम्पी थिअटर एक पर्वणी ठरणार आहे़