मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला अमित शाह छत्रपती संभाजीनगरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 13:26 IST2023-09-11T13:18:29+5:302023-09-11T13:26:07+5:30

१६ सप्टेंबर रोजी शहरात; ‘अभाविप’च्या कार्यक्रमाला लावणार हजेरी

Amit Shah in Chhatrapati Sambhajinagar on the eve of Marathwada Liberation Day | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला अमित शाह छत्रपती संभाजीनगरात

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला अमित शाह छत्रपती संभाजीनगरात

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवार, १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी शहरात येणार आहेत. केंद्रीय गृहखात्याकडून त्यांचा दौरा निश्चित झाल्याचे भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांना कळविण्यात आले आहे.

अभाविपने एस. बी. कॉलेजमध्ये एका रॅलीचे आयोजन केले आहे. या रॅलीला गृहमंत्री शाह उपस्थित राहतील. त्यानंतर त्यांच्या उपस्थितीत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त सभा होईल. १६ रोजी दुपारी ३ वाजता विमानाने बिहारमधील दरभंगा येथून येतील. संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांचे विमानतळावर आगमन होईल. ५ वाजून ३० मिनिटांनी कार्यक्रमस्थळाकडे रवाना होतील. त्यानंतर ५:३० ते ६:३० वाजेपर्यंत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमासाठी त्यांचा वेळ आरक्षित आहे. ६ वाजून ४५ मिनिटांनी ते विमानतळावरून हैद्राबादकडे रवाना होतील. दरम्यान, गृहमंत्री शाह यांच्या उपस्थितीत गरवारे स्टेडियमच्या बाजूला रिद्धीसिधी लॉनवर सभेचे नियोजन करण्भायात येणार असल्याची माहिती आहे. 

Web Title: Amit Shah in Chhatrapati Sambhajinagar on the eve of Marathwada Liberation Day