शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
4
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
Latest Marathi News LIVE: नसरापूर प्रकरण: विशेष सरकारी वकील म्हणून तीन नावांची शिफारस
6
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
9
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
10
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
11
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
12
Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
13
ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपीची जजनी मागितली माफी; अमेरिकेत नवा वाद, नेमकं कारण काय?
14
कैद्यांना मिळणारी पॅरोल आणि फर्लो रजा काय असते? कुणाला मिळू शकते, किती दिवस, नियम काय?
15
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
16
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
17
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
18
गेल्या ५० वर्षांत प. बंगालमध्ये झाले फक्त तीन मुख्यमंत्री; एकाची कारकीर्द २३ वर्षांहून जास्त! जाणून घ्या...
19
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
20
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या वाहनांवरील अंबर दिवे कायम

By admin | Updated: August 21, 2014 01:20 IST

अमित सोमवंशी, उस्मानाबाद अतिमहत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्ती, अधिकारी यांना लाल, अंबर दिवा किंवा फ्लॅशरसंदर्भात गृहविभागाने १० डिसेंबर २०१३ रोजी धोरण स्पष्ट केले होते

अमित सोमवंशी, उस्मानाबादअतिमहत्त्वाच्या, महत्त्वाच्या व्यक्ती, अधिकारी यांना लाल, अंबर दिवा किंवा फ्लॅशरसंदर्भात गृहविभागाने १० डिसेंबर २०१३ रोजी धोरण स्पष्ट केले होते. परंतु, यात पुन्हा बदल करुन नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. नव्या आदेशानुसार फक्त राज्यातील नऊ अतिमहत्वाच्या व्यक्तींना लाल दिवा व फ्लॅशर दिला आहे. यात महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री, मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश, विधानपरिषदेचे सभापती, अध्यक्ष व विधान मंडळांचे विरोधी पक्षनेता आणि मुंबई न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याच वाहनांच्या टप्प्यावर लाल दिवा असणार आहे.या आदेशाच्या अनुषंगाने येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) संबंधितांना सूचनाही दिल्या होत्या. यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीचे अंबर दिवे काढून निळे दिवे बसवून नियमाची अंमलबजावणी केली. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिस विभागाने मात्र, हे नियम धाब्यावर बसवित गाडीवरील अंबर दिवे अद्यापही कायम असून, यावर परिवहन कार्यालयाकडूनही कारवाई झाल्याचे दिसत नाही.

 लाल दिवा, अंबर दिवा आणि निळ्या दिव्यांच्या संदर्भात राज्याच्या गृहविभागाने धोरण स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही वाहनावरील दिव्याच्या वापरासंबधी कठोर निर्देश दिले आहेत. त्यानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी नियमानुसार दिवे बदलले आहेत. पोलिस प्रशासनानेही त्यांच्या वाहनांवरील अंबर दिवे काढून निळे दिवे बसविणे गरजेचे आहे. परंतु, पोलिस दलातील वाहनांवरील अंबर दिवे अद्यापही कायम आहेत.