शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जाचे संथगतीनेच वाटप

By admin | Updated: August 21, 2014 01:19 IST

जालना : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्ज वाटप करण्यासाठी ७९७ कोटी रुपयांचे उद्दिष्टे असले तरी विविध बँकांनी अद्यापही फक्त ४९१ कोटी ५० लाख रूपयाचे वाटप केले आहे.

जालना : खरीप हंगामासाठी जिल्ह्याला पीक कर्ज वाटप करण्यासाठी ७९७ कोटी रुपयांचे उद्दिष्टे असले तरी विविध बँकांनी अद्यापही फक्त ४९१ कोटी ५० लाख रूपयाचे वाटप केले आहे. त्याची सरासरी ६२ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात अद्याप एकही नदी - नाल्याला पूर जाईल, असा पाऊस झाला नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनातर्फे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्ज देण्यात येत आहे. परंतु बँकांच्या अडेलवृत्तीमुळे आणि उदसिनतेमुळे अद्यापही जिल्हात पीककर्ज देण्याला म्हणावी तशी गती आली नाही. पीक कर्जासंदर्भात लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित केले. त्याची पालकमंत्र्यांनी दखल घेत शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज देण्यात यावे, अशा बँकाना सूचना केल्या. परंतु अद्यापही कर्जाची गती पुढे सरकत नसल्याने शेतकरी दररोज बँकांचे खेटे मारत असल्याचे चित्र आहे.सर्व बँकाना पिककर्जाची गती वाढविण्यासाठी सांगण्यात आले आहे. येत्या महिन्याभरात संपूर्ण उद्दिष्टाच्या जास्त पिककर्ज वाटप करण्याचे आमचे उद्दिष्टे असल्याचे अग्रणी बँकेचे उपव्यवस्थापक महेश बोरूडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)या जिल्ह्यातील खाजगी बॅँकांनी आतापर्यंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना २१ कोटी ६० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना २२ कोटी १५ लाख एवढे पीक कर्जाचे वितरण केले आहे. त्याची टक्केवारी १०३ टक्के एवढी आहे. त्या तुलनेत जिल्हा मध्यवर्ती बॅँक पिछाडीवर आहे. या बॅँकेस यावर्षी १२० कोटी ८० लाख रुपयांच्या पीक कर्जांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु या बॅँकेने केवळ ६७ कोटी १ लाख रुपयांचेच पीक कर्ज वितरीत केले असल्याची माहिती बॅँकेच्या सूत्रांनी दिली. ४दरम्यान, जिल्हा बॅँकेच्या या संथ गतीने सुरु असणाऱ्या पीक कर्जाच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले असताना शेतकऱ्यांचा आर्थिक कना ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅँकेकडून पीक कर्जाचे मुदतीच्या आतच वितरण पूर्ण होईल, असे अपेक्षित होते.