सर्वांगीण विकास आवश्यक - राहुल पुंगालिया

By Admin | Updated: December 18, 2015 23:49 IST2015-12-18T23:36:26+5:302015-12-18T23:49:07+5:30

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’,

All-round development needed - Rahul Pangalia | सर्वांगीण विकास आवश्यक - राहुल पुंगालिया

सर्वांगीण विकास आवश्यक - राहुल पुंगालिया

औरंगाबाद : ‘साहित्य हे स्वायत्त असावे, कारण साहित्यामुळे विकासासाठी मानसिक तयारी होते, त्यामुळे सर्वांगीण विकास असेल तरच सकारात्मक बदल घडवता येतो’, असे मत विचारवंत डॉ. राहुल पुंगालिया यांनी ‘कल्चर, आयडियॉलॉजी अ‍ॅण्ड लिटरेचर’ या विषयावर बोलताना व्यक्त केले. मौलाना आझाद महाविद्यालय व डॉ. रफिक झकेरिया सेंटर फॉर हायर लर्निंग अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हान्स रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी फातिमा रफिक झकेरिया होत्या. त्या म्हणाल्या, ‘शिक्षण आणि सत्ता या दोन गोष्टींमुळे संस्कृती जन्माला येत असते. म्हणूनच अशा विषयांवर चर्चा होणे गरजेचे आहे.’ व्यासपीठावर डॉ. ए. जी. खान, डॉ. मकदुम फारुकी, प्राचार्य सतीश जयराम, सलीम बिस्मिल्लाह खान, डॉ. फरहाना खान, डॉ. हसीब खान आदींची उपस्थिती होती.
डॉ. ए. जी. खान यांनी विचार व संस्कृतीद्वारे ऐक्य साधण्याचे आवाहन केले. डॉ. रफि उद्दीन नासेर यांनी ‘वायू प्रदूषण’ या विषयावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. येमेन येथील विद्यार्थ्यांनी फातिमा झकेरिया यांचा मानचिन्ह देऊन सत्कार केला.
डॉ. फरहाना खान यांनी प्रास्ताविक केले. संचालन डॉ. हसीब खान यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. एहतेशाम काद्री यांनी करून दिला. प्रा. राजन शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी डॉ. हमीद खान, मुक्रिम खान, डॉ. रब्बानी, डॉ. रझाउल्लाह खान, डॉ. झाहेद झहीर, डॉ. शाहेद जी. शेख, प्रा. झकीउद्दीन सिद््दीकी, डॉ. निलोफर शाकेर, डॉ. मेहेरुन्निसा पठाण, डॉ. मुस्तजीब खान, डॉ. परवेझ अस्लम, डॉ. शेख कलीम, अब्दुल्लाह जिलानी, झरीना देशमुख, खालेद अहेमद आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: All-round development needed - Rahul Pangalia