शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व मालमत्तांची होणार नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2015 01:00 IST

बीड : नगर पालिकांकडे मालमत्तेची नोंद नसल्यामुळे लाखो रूपयांचा चुना लावला जातो. मात्र, आता मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्याचे मोजमाप इंटनरेटवरून समजू शकणार आहे.

बीड : नगर पालिकांकडे मालमत्तेची नोंद नसल्यामुळे लाखो रूपयांचा चुना लावला जातो. मात्र, आता मालमत्तांचे सर्वेक्षण करून त्याचे मोजमाप इंटनरेटवरून समजू शकणार आहे.शासकीय नियमानुसार प्रत्येक चार वर्षाला नगर परिषद अंतर्गत असणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. परंतु गेल्या १० ते १५ वर्षांपासून न. प. अंतर्गत असणाऱ्या मालमत्तांचे सर्वेक्षण झालेले नाही. यामुळे कोणाची किती मालमत्ता आहे याची माहिती न. प. कडे उपलब्ध नाही. त्यासाठी राज्य स्तरावरून मालमत्ता सर्वेक्षण करण्याची सूचना मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.केज नगर पंचायतीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तर गेवराई व बीड नगर पालिकांचे सर्वेक्षण १ एप्रिलपासून सुरू झालेले आहे. धारूर, परळी, माजलगाव येथील मालमत्तांचे मोजमाप इंटरनेटद्वारे पहावयास मिळणार आहे. या मोहिमेद्वारे प्रत्येक मालमत्तेची नोंद घेतली जाणार आहे. तसेच बांधकाम क्षेत्र किती आहे याची नोंद होणरा आहे. शासकीय, खाजगी सर्व प्रकारच्या जागेवर असलेल्या मालमत्तेचा सर्वेक्षणामध्ये समावेश असणार आहे. नगर रचनाकार यांच्याद्वारे यादी तयार करून ती मुख्याधिकारी यांच्याकडे पाठविली जाणार आहे. संपत्तीचे मूल्य निर्धारित केले जाईल. या संदर्भात तक्रारी असतील तर त्या सुध्दा निकाली काढण्यात येणार आहेत. मालमत्तेचे क्षेत्र, त्याचा वापर, त्यानुसार कर आकारणी केली जाणार आहे. यामुळे आगामी काळात नगर परिषदांना स्थानिक करातून मोठा निधी मिळण्याची शक्यता आहे.