शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा म्हणणा-या अजित पवारांचा एकत्र विमान प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 12:48 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. एका लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार औरंगाबादला निघाले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा एकत्र विमान प्रवास लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार औरंगाबादला निघाले होतेलग्नसोहळ्याला पोहोचण्यासाठीही दोघांनी एकाच गाडीचा वापर केला

औरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला आहे. एका लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार औरंगाबादला निघाले होते. यावेळी दोघेही एकाच विमानात होते. लग्नसोहळ्याला पोहोचण्यासाठीही दोघांनी एकाच गाडीचा वापर केला. यावेळी अजित पवारांना मुख्यमंत्र्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण २०१९च्या निवडणुकीपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचं सांगत, त्यांची संगत टाळणार असल्याचं अजित पवार काही दिवसांपुर्वी बोलले होते. 

लग्नासोहळ्यासाठी रात्री मुख्यमंत्री मुंबईहून आपल्या खास विमानाने औरंगाबादकडे निघाले होते. त्यांनी आपल्या दौ-याची माहितीही उघड केली नव्हती. चिकलठाणा विमानतळावर विमान लँड झाल्यानंतर अजित पवारही त्यांच्यासोबत होते याची माहिती मिळाली. दोन्ही नेते विमानातून उतरल्यानंतर एकाच गाडीनं लग्नकार्यात पोहोचले. आता या प्रवासात दोघांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली हे मात्र कळू शकलेलं नाही. 

मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा! यापुढे फडणवीसांना बोलावणार नाही - अजित पवार२०१९च्या निवडणुकीपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर केले होते. आमचे मुख्यमंत्र्यांशी भांडण नाही, परंतु, यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व दिलीप वळसे यांच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यातील उपस्थितीवरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्या सोहळ्याकडे पाठ फिरवली. शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेतलेली असताना राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये जवळीक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या चिंतन बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे यापुढे कोणत्याही नेत्याच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री अथवा भाजपाच्या नेत्यांना न बोलविण्याचा निर्णय झाला होता.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी