शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळ निदेशक वार्ष्णेय हर्सूल कारागृहात

By admin | Updated: August 4, 2016 00:38 IST

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ निदेशक अलोक वार्ष्णेय याचा जामीन अर्ज अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला.

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ निदेशक अलोक वार्ष्णेय याचा जामीन अर्ज अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी फेटाळला. वार्ष्णेयची हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान १० हजारांची लाच घेतल्याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला तातडीने निलंबित केले असल्याची माहिती बचाव पक्षाने न्यायालयास दिली. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानतळ प्राधिकरणाचे निदेशक अलोक वार्ष्णेय यांनी ३० जुलै रोजी मालाड येथील खासगी कंपनीच्या व्यक्तीकडून १० हजारांची लाच घेताना सीबीआयच्या पथकाने अटक केली होती. न्यायालयाने बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याला अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्याच्या कार्यालयातील कागदपत्र हस्तगत करावयाचे आहे असा युक्तिवाद सीबीआयचे वकील डी. एन. म्हस्के यांनी केला, तर बचाव पक्षाच्या वतीने अ‍ॅड. नीता बागवे यांनी सर्व कागदपत्र हस्तगत करण्यात आले असून पोलीस कोठडीची गरज नसल्याची बाजू मांडली. अ‍ॅड. नीता बागवे यांनी तातडीने जामिनासाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर अप्पर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांच्यासमोर सुनावणी झाली असता त्यांनी तो जामीन अर्ज फेटाळला. त्याचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे हर्सूल कारागृहात रवानगी करण्यात आली. प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वार्ष्णेयला निलंबित केल्याची माहिती न्यायालयात दिली.