शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपाचे २ हजार ६० कोटींचे उद्दिष्ट

By admin | Updated: April 14, 2016 01:12 IST

शिरीष शिंदे , बीड यंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे,

शिरीष शिंदे , बीडयंदा मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा जास्त होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, राज्य शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना पीककर्ज वाटपाचे २ हजार ५९ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. विशेष म्हणजे पीककर्जासह वाहन, हाऊसिंग, शिक्षण, कृषी संबधी व इतर अशा सर्व क्षेत्रांसाठी ३ हजार ६९६ कोटी ७८ लाख रुपये कर्ज वाटप करावे लागणार आहे.२०१५-१६ मध्ये बँकांना पीककर्जासाठी एक हजार ८०६ कोटी ९ लाख रूपयांचे टार्गेट देण्यात आले होते. त्यात यंदा ११ ते १२ टक्के वाढ होऊन ते दोन हजार ५९ कोटींवर जाऊन पोहचले आहे. त्यामध्ये औद्योगिक व व्यवसायासाठी ७९८ कोटी ७५ लाख, गृहनिर्माणसाठी १७५ कोटी, शिक्षणासाठी ११५ कोटी, इतर बाबींसाठी ५६ कोटी ८८ लाख तर कृषिसंबंधी असलेल्या म्हणजेच पॉवर, ट्रिलर, ट्रॅक्टर, गायी-म्हशी यासाठी ४८२ कोटी २४ लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जिल्ह्यातील २२ राष्ट्रीयीकृत बँका व त्यांच्या शाखा तसेच तीन व्यावसायिक बँका यांच्यासह इतर बँकांना हे टार्गेट देण्यात आले आहे. त्यानुसार शाखानिहाय कर्जवाटप यावर्षी होईल.शेतकऱ्यांना नव्याने पीककर्ज ?जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळ कायम आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यापूर्वी घेतलेले पीककर्ज फेडता आलेले नाही. आता चांगला पाऊस असला तरी त्यांना नव्याने पीककर्ज मिळेल का ? याबाबत कोणत्याही सूचना बँकांना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे पीककर्ज घेऊन परत करणाऱ्यांनाच कर्ज मिळेल, अशी शक्यता आहे.