शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपूर मतदारसंघ भाजपाचा आहे आणि राहणार

By admin | Updated: August 24, 2014 00:20 IST

अहमदपूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ १९८६ पासून भाजपाचा बालेकिल्ला आहे़ महायुतीतील रासपला देण्यात येऊ नये अशी भूमिका अहमदपूर

अहमदपूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ १९८६ पासून भाजपाचा बालेकिल्ला आहे़ महायुतीतील रासपला देण्यात येऊ नये अशी भूमिका अहमदपूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाच्या सर्व इच्छुकांनी एका व्यासपीठावर येऊन मागणी केली़ आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून भाजपा वाढविण्यासाठी प्रयत्न केला आणि आता आयत्या पिकावर दुसरीच पाखरं ताव मारण्याचा प्रयत्न करत असेल तर पक्षासाठी काम करायचे की नाही असा आक्रमक सवालही त्यांनी केला़ अहमदपुरात दोन दिवसापूर्वी रासपचा मेळावा झाला़ या मेळाव्यात रासपचे नेते महादेव जानकर यांनी अहमदपूर मतदारसंघ महायुतीकडून रासपकडे घेणार असल्याचे सांगितल्याने हा मतदारसंघ रासपला सुटणार असल्याची चर्चा आहे़ त्यामुळे तालुक्यातील भाजपाचे तुल्यबळ नेते आपआपसातील मतभेद विसरुन एकत्रित आले होते़ आपापले गट विसरुन एकमेकांच्या गळ्यात गळा घालून यांनी मतदारसंघ भाजपाचा आहे़ आणि भाजपालाच रहावा अशी अपेक्षा व्यक्त केली़ यामध्ये भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड़ भारत चामे, माजी सभापती दिलीपराव देशमुख, अशोक केंद्रे, सरपंच शिवाजीराव भिकाणे, माजी नगराध्यक्ष सुधाकर नागरगोजे, त्र्यंबक गुट्टे, बाबुराव जंगापल्ले आदींची उपस्थिती होती़ याठिकाणाहून दोनदा भाजपाचा उमेदवार विजयी झाला आहे़ गत लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपाला ५६ हजार मतांची आघाडी मिळाली आहे़ त्यामुळे हा मतदारसंघ भाजपालाच रहावा़ यावेळी हाके म्हणाले, महायुतीची जागा वाटपाची कुठलीही चर्चा अद्याप उच्च पातळीवर झाली नाही़ मतदारसंघ सोडत असताना मतदारांचा कौल पाहिला जातो़ त्यावर वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात येतो़ कुठलीही चर्चा झाली नसल्याने निर्णय झाला नसल्याचे ते म्हणाले़ (वार्ताहर) अहमदपूर विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा परंपरागत मतदारसंघ आहे़ मी पाच वर्षे भाजपाचा आमदार म्हणून काम केले आहे़ दुसऱ्यावेळी झालेल्या निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झाला़ कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ रासपला सुटणार नाही़ भाजपाकडे राहील़ -बब्रुवान खंदाडे, माजी आमदार ४भाजपा वाढविण्यासाठी अहमदपूर तालुक्यात गेल्या १५ वर्षांपासून काम केले, ऐनवेळी परका माणूस रासपचे तिकिट घेऊन इथली भाजपा संपविण्याचा कट करत असेल तर ते खपवून घेणार नाही - दिलीप देशमुख,माजी सभापती ४हा मतदारसंघ भाजपाचा आहे़ तो कायम राहणार आहे़ कोणत्याही पक्षातील नवख्या उमेदवाराला देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही़ भाजपाचा मतदारसंघ कायम राहणार आहे़ - अ‍ॅड़भारत चामे, माजी सभापती ४अहमदपूर मतदारसंघात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांना मानणारा मतदारवर्ग अधिक आहे़ हा मतदारसंघ भाजपाचाच आहे आणि भविष्यात भाजपाचा राहील़ रासपला सुटणार नाही़ -अशोक केंद्रे, माजी सभापती ४भाजपाचा मतदारसंघ आहे, त्यामुळे दुसऱ्यांना सोडण्याचा प्रश्नच नाही़- सुधाकर नागरगोजे, माजी नगराध्यक्ष