शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओत वर्षानुवर्षे ‘एजंट’राज

By admin | Updated: July 21, 2016 01:17 IST

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटांकडून छोट्या-छोट्या कामांसाठी वाहनधारकांची सर्रास आर्थिक लूट केली जाते.

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात एजंटांकडून छोट्या-छोट्या कामांसाठी वाहनधारकांची सर्रास आर्थिक लूट केली जाते. आरटीओत मंगळवारी पैसे घेऊनही कामास टाळाटाळ क रणाऱ्या एजंटला एका महिलेने चांगलाच चोप दिला. या घटनेमुळे आरटीओतील ‘एजंट’गिरीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. मात्र, या प्रश्नाकडे प्रशासनाचे कायम दुर्लक्ष होत असल्याने वर्षानुवर्षे या ठिकाणी ‘एजंट’राज कायम राहत आहे.आरटीओ कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी एजंट मंडळींनी बस्तान मांडले आहे. तात्काळ कामे करून देण्यात येईल,असे सांगून एजंट वाहनधारकांकडून पैसे उकळतात. कामे लवकरच होण्याच्या आशेने वाहनधारकही स्वत: कामे करण्याऐवजी एजंटकडेच जाण्यास प्राधान्य देतात. वाहनधारकांना एजंटकडे जाण्याची वेळ येऊ, यासाठी गेल्या काही दिवसांत कार्यालयात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. कार्यालयात प्रत्येक कक्षासमोर रांगेत उभे राहण्यासाठी लोखंडी बॅरिके टस्, त्यावर शेड आहेत. प्रत्येक कक्षावर कामाचे स्वरूप, तेथे कार्यरत अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या नावाची पाटी बसविण्यात आली आहे. प्रत्येक कामाची प्रक्रिया, त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती देणारे फलकही लावण्यात आले आहे. शिवाय मदतीसाठी जनसंपर्क अधिकारी आहेत. एवढे सर्व करूनही एजंटकडे जाण्याचे प्रमाण काही केल्या कमी होत नसल्याचे दिसते. कारण यामध्ये कार्यालयातीलच काही जणांकडून अडसर निर्माण केला जातो. त्यामुळे एजंट‘राज’ वाढीला एकप्रकारे हातभार लागत आहे. अशा एजंटांना बाहेरचा रस्ता दाखविण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांनीच एजंटकडे जाऊ नये, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले.