सिडकोतील अग्रसेन चौक अखेर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2016 00:31 IST2016-05-17T00:13:32+5:302016-05-17T00:31:44+5:30

औरंगाबाद : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जालना रस्त्यावरील अग्रसेन चौक कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. आकाशवाणी चौक बंद करण्याबाबत नागरिकांची मते

Agadarajan square of CIDCO finally closed | सिडकोतील अग्रसेन चौक अखेर बंद

सिडकोतील अग्रसेन चौक अखेर बंद

औरंगाबाद : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जालना रस्त्यावरील अग्रसेन चौक कायमस्वरुपी बंद करण्यात आला आहे. आकाशवाणी चौक बंद करण्याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्तालयात बुधवारी सकाळी साडेदहा वाजता नागरिकांची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सोमवारी दिली.
सिडकोचा उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. विमानतळाकडून येणाऱ्या वाहनांमुळे अग्रसेन चौकात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या चौकातून वाहनचालकांना आता ‘यू- टर्न’ घेता येणार नाही. प्रायोगिक तत्त्वावर सोमवारी व मंगळवारी हा चौक बंद केला जाईल. उड्डाणपूल खुला झाल्यानंतर मात्र तो कायमस्वरुपी बंद केला जाईल. अग्रसेन चौक बंद केल्याने एन-३ चौकातील टी पॉइंटवर वाहनांची वर्दळ वाढून कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या चौकाबाबतही नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
आकाशवाणी चौकाची अभियांत्रिकीदृष्ट्या रचना चुकीची असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.
हा चौक यापूर्वी वाहतुकीसाठी बंद केला होता. चौक कायमस्वरुपी बंद करावा का, यासाठी मनजितनगर व इतर भागातील नागरिकांची मते जाणून घेतली जातील. त्यासाठी बुधवारी बैठक घेतली जाणार आहे. या बैठकीस संबंधितांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Agadarajan square of CIDCO finally closed