शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

यशवंतरावानंतर राजकारण भरकटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2015 13:35 IST

यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली.

नांदेड : यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर पहिले मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रतिकूल राजकीय परिस्थितीत राज्याचे सूत्रे स्वीकारली. त्यावेळी राज्याच्या विविध विभागांमध्ये परस्परांबद्दल अविश्‍वास, संशय व तणावाचे वातावरण होते. त्यामुळे प्रादेशिक एकात्मता निर्माण करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. या सर्व बिकट अवस्थेतून महाराष्ट्राला बाहेर काढण्याचे काम यशवंतरावांनी केले. परंतु त्यांच्यानंतर मात्र महाराष्ट्राचे राजकारण भरकटले असल्याचे प्रतिपादन राजकीय वेिषक प्रा.डॉ.प्रकाश पवार यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र, लातूर आणि पीपल्स कॉलेजच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित परिसंवादात प्रा. डॉ. पवार बोलत होते. ते म्हणाले, यशवंतरावानंतर काही मुख्यमंत्र्यांनी चांगले प्रयत्न केले. परंतु अनेक कारणांमुळे त्यांना यश आले नाही. त्यात वसंतराव नाईक, शरद पवार आणि शंकरराव चव्हाण यांचा समावेश आहे. यशवंतरावाच्या वेळी जातीय व सामाजिक विषमता मोठय़ा प्रमाणावर होती. त्यामुळे सामाजिक न्यायाची प्रस्थापना करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. परंपरागत सामाजिक मूल्ये आणि सरंजामशाही मनोवृत्तीला आधुनिकतेत रुपांतरित करणे हाही त्यांच्यादृष्टीने महत्वाचा प्रश्न होता. त्यातून एकसंघ, विकसीत, संपन्न व आधुनिक महाराष्ट्र निर्माण करण्याचा निर्धार यशवंतरावांनी केला होता. त्याची अंमलबजावणीही नेटाने केली. माजी मंत्री कमलकिशोर कदम म्हणाले, शरद पवार यांनी अत्यंत काळजीपूर्वक परिस्थिती हाताळत सहमतीचे राजकारण केले. त्यामुळे अनेक पक्षांत त्यांचे मित्र आहेत. एक सहकारी या नात्याने पवार यांच्यासोबतच्या वैयक्तिक आठवणीही त्यांनी सांगितल्या. सूत्रसंचालन डॉ.अशोक सिद्धेवाड यांनी केले. प्रास्ताविक प्रा. उत्तमराव सूर्यवंशी तर हरिभाऊ जवळगे यांनी आभार मानले. /(प्रतिनिधी)