सुखना नंतर आता खाम नदीचा नंबर! नदी पात्रातील गोठे अन् गोदाम जमीनदोस्त, एक एकर जागा रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 19:53 IST2026-05-15T19:51:44+5:302026-05-15T19:53:33+5:30

खाम नदीतील एक एकर जागा मनपाने घेतली ताब्यात; अतिक्रमणांविरुद्ध आयुक्तांचा कडक पवित्रा.

After Sukhna, now it's Kham River's turn! 6 cowsheds and godowns in the riverbed demolished, one acre of land seized | सुखना नंतर आता खाम नदीचा नंबर! नदी पात्रातील गोठे अन् गोदाम जमीनदोस्त, एक एकर जागा रिकामी

सुखना नंतर आता खाम नदीचा नंबर! नदी पात्रातील गोठे अन् गोदाम जमीनदोस्त, एक एकर जागा रिकामी

छत्रपती संभाजीनगर : खाम नदी पात्रालगत बेगमपुरा स्मशानभूमीजवळील अतिक्रमणे काढण्यास मनपाकडून सुरुवात झाली. सहा म्हशीचे गोठे आणि एक भंगार व्यापाऱ्याचे गोदाम निष्कासित करण्यात आले. गत आठवड्यात महापालिकेने सुखना नदी पात्रातील चिकलठाणामधील अतिक्रमणे हटविली होती. आयुक्त अमोल येडगे यांनी पात्रातील सर्व अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते.

सुखना नदीप्रमाणे खाम नदीपात्रातही मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत. काही ठिकाणी तर पात्रात प्लॉटिंग पाडून नागरिकांना जागा विक्री केल्या आहेत. पावसाळ्यापूर्वी दोन्ही नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यात येणार आहेत. गुरुवारी मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने खाम नदीतील बेगमपुऱ्यात असलेली अतिक्रमणे काढली. अतिक्रमण विभागाचे संनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांच्या आदेशाने उपायुक्त सविता सोनवणे, झोन क्र.१ च्या लता पुजारी, संजय सुरडकर, बेगमपुरा ठाण्याचे निरीक्षक नरेंद्र पापळकर, इमारत निरीक्षक मुकेश खडसे, रवींद्र देसाई, सागर श्रेष्ठ आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

मनपाची एक एकर जागा 
याठिकाणी महापालिकेची सुमारे एक एकर जागा आहे, या जागेवर गत अनेक महिन्यापासून काही लोकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करून पत्र्याचे शेड उभारून गोठे बांधले होते. तसेच आसपास दोन-तीन मातीची घरेही बांधली होती. हे सर्व अतिक्रमण काढून जागा मोकळी करून घेतली, अशी माहिती उपायुक्त सोनवणे यांनी दिली आहे. खाम नदीपात्रात आणखी बरीच अतिक्रमणे असून, संबधितांनी ती स्वत:हून काढून घ्यावीत. महापालिकेकडून लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण हटाव विभागाने कळविले.

Web Title : सुखना के बाद खाम नदी पर अतिक्रमण ध्वस्त; एक एकड़ भूमि खाली

Web Summary : सुखना नदी के बाद, औरंगाबाद नगर निगम ने बेगमपुरा के पास खाम नदी के किनारे अतिक्रमण हटा दिया, जिससे एक एकड़ जमीन खाली हो गई। अस्तबल और गोदाम ध्वस्त कर दिए गए। मानसून से पहले और अतिक्रमण हटाए जाएंगे।

Web Title : After Sukhna, Kham River Encroachments Demolished; One Acre Land Cleared

Web Summary : Following Sukhna River, Aurangabad Municipal Corporation cleared encroachments along Kham River near Begumpura, freeing one acre of land. Stables and warehouses were demolished. More encroachments will be removed before monsoon.