शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 29, 2025 19:52 IST

सुवर्णखरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यांसाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

छत्रपती संभाजीनगर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानली जाणारी अक्षय तृतीया यंदा एका अद्वितीय योगाचा साक्षीदार ठरणार आहे. ३० एप्रिल रोजी, अक्षय तृतीया, तृतीयासह चतुर्थी, रोहिणी नक्षत्र आणि बुधवारचा दिवस असा दुर्मीळ संयोग साधला आहे. गेल्या १२४ वर्षांत असा योग प्रथमच घडत आहे, असे ज्योतिषशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

यंदा अक्षय तृतीया तृतीया तिथीला सुरू होत असताना चतुर्थीचा स्पर्शही होणार आहे. त्याचवेळी चंद्र रोहिणी नक्षत्रात भ्रमण करणार आहे आणि तोही बुधवारी. बुधग्रहाशी संबंधित शुभवार. या अद्भुत संगमामुळे यंदाची अक्षय तृतीया विशेष फलदायी ठरणार आहे. सुवर्णखरेदी, नवीन कामांना आरंभ, शिक्षण, विवाह, व्यवसाय, गृहप्रवेश आदी शुभकार्यांसाठी अत्यंत उत्तम मुहूर्त असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

१९८२ या वर्षी होती सोमवारी अक्षय तृतीयावैशाख मासामध्ये अक्षय तृतीया सोमवारी किंवा बुधवारी येणे दुर्मिळ योग मानला जातो. अक्षय तृतीया २६ एप्रिल १९८२ मध्ये सोमवारी आली होती. त्या दिवशी तृतीयासह चतुर्थी अशी होती.

पक्ष्यांना पाणी, जनावरांना चारा द्यावाशास्त्रात असे म्हटले आहे की, अक्षय तृतीया वैशाख मासामध्ये अक्षय तृतीया व रोहिणी नक्षत्र सोमवारी किंवा बुधवारी आली तर ते अत्यंत दुर्लभ मानली जाते. १९०१ पासूनचे पंचाग पाहिले पण मागील १२४ वर्षांत असा योग आढळून आला नाही. अशा दिवशी कोणी पुण्यकर्म करतील त्याचे फळ सहस्रकोट मिळते. यंदा अक्षय तृतीया बुधवारी आली आहे. पुण्य कर्मासाठी पक्ष्यांसाठी दाणापाण्याची, जनावरांसाठी चारा, पाण्याची सोय करण्यात यावी. पितरांचे श्राद्ध करावे, जलकुंभ दान करावे.- वे.शा.स. सुरेश केदारे गुरुजी

यंदा परशुराम जन्मोत्सव- अक्षय तृतीया वेगवेगळीदरवर्षी अक्षय तृतीया व परशुराम जयंती एकाच दिवशी येत असते. मात्र, यंदा मंगळवारी भगवान परशुराम जन्मोत्सव व बुधवारी अक्षय तृतीया आली आहे. मागील १५ वर्षात असा योग येण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी २०१३, २०१६ व २०२० या वर्षी अक्षय तृतीया व भगवान परशूराम जन्मोत्सव एक दिवसाच्या फरकाने आले होते. मात्र नेहमीप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयेला महात्मा बसवेश्वर जयंती आली असून ती त्याच दिवशी साजरी केली जाणार आहे.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAkshaya Tritiyaअक्षय्य तृतीया