शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद ! सीएस परीक्षेत औरंगाबादचा सुदर्शन महर्षी देशात प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 19:57 IST

विशेष म्हणजे, सुदर्शन याने सीए आणि सीएस या दोन्ही कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत.

औरंगाबाद : इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आयसीएसआय) च्या औरंगाबाद शाखेसाठी आज ऐतिहासिक दिवस ठरला आहे. या शाखेचा विद्यार्थी सुदर्शन महर्षी याने कंपनी सेक्रेटरी (सीएस, व्यावसायिक - जुना अभ्यासक्रम ) परीक्षेत घवघवीत यश प्राप्त करत देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. सीए सुदर्शन महर्षी यांने 900 पैक्की ५५२ गुण मिळवत या बहुमान प्राप्त केला. राष्ट्रीय पातळीवर अव्वल क्रमांक मिळवणारा औरंगाबाद शाखेतला तो पहिला विद्यार्थी ठरला आहे. विशेष म्हणजे, सुदर्शन याने सीए आणि सीएस या दोन्ही कठीण परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्या आहेत. या यशावर बोलताना सुदर्शन म्हणाला की, मी अत्यंत आनंदी असून माझ्या मेहनत आणि समर्पणाचे हे यश आहे. मे २०१६ मध्ये सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी करण्याचा माझा विचार होता. परंतु, सीएस बनून अधिक कौशल्य प्राप्त करण्याचे मी ठरवले. या दरम्यान, मी दोन कंपन्यांमध्ये काम केले. पण अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मी दोन्ही नोकऱ्या सोडल्या. त्यात कोव्हीडमुळे मिळालेल्या सक्तीच्या सुट्या एकप्रकारे बक्षीसच ठरल्या. कारण मी दिवसातील 10 ते 12 तास अभ्यास करू शकलो. या परीक्षेत लेखन कौशल्य आणि सादरीकरण हे खूपच महत्त्वाचे आहे. यासाठी मला माझा सीए परीक्षेचा अनुभव उपयोगी पडला, असेही त्याने सांगितले. सुदर्शनचे सर्व शिक्षण औरंगाबादमध्येच झाले आहे. तो श्री गुरु तेग बहादूर शाळेचे विद्यार्थी आहे. त्याचे बीकॉम देवगिरी महाविद्यालयात तर एमकॉम सरस्वती भुवन महाविद्यालयातून झाले आहे. 

संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी केली मला कोणताही क्रमांक मिळवायचा नव्हता, मात्र सीएसचा संपूर्ण अभ्यास क्रमांकाची सखोल तयारी करायचा मी सुरुवातीपासून संकल्प केला होता. अभ्यासाअंती मी कोणत्याही प्रश्नासाठी तयार होतो. सुधारणा आणि परिपूर्णता हेच माझे लक्ष्य होते. कोणतीही खाजगी शिकवणी घेतली नसून केवळ स्वयं अध्ययनावर भर दिला. तसेच परीक्षेच्या तयारीसाठी आयसीएसआय मॉड्यूल्सचा वापर केला आणि यश मिळवले.- सुदर्शन महर्षी

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थी