शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
3
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
4
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
5
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
6
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
7
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
8
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
9
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
11
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
12
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
14
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
15
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
16
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
17
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
18
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
19
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
20
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

जिंतुरात आदिवासी समाजाचा मोर्चा

By admin | Updated: July 31, 2014 00:41 IST

जिंतूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे घटनाबाह्य आहे़,

जिंतूर : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे घटनाबाह्य आहे़, असे सांगून त्यास विरोध करण्यासाठी आदिवासी समाजबांधवांनी बुधवारी जिंतूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ मोर्चात असंख्य महिला सहभागी होत्या़धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये, या मागणीला विरोध म्हणून आदिवासी समाजबांधवांनी शक्तिप्रदर्शन केले़ बिरसा मुंडा चौकातून सकाळी ११़३० वाजता मोर्चास सुरुवात झाली़ मुख्य चौकातून शिवाजी चौक मार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला़ यावेळी आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाबाबत मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले़अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, केंद्र सरकारच्या आरक्षण सूचीमध्ये नामसदृश्य उल्लेखाचा गैरफायदा घेऊन आदिवासी समाजामध्ये हा समाज समाविष्ट करण्यात येत आहे़ बिहार, ओरिसा व झारखंड येथे धनगड ही जमात अनुसूचित जमातीमध्ये येते़ याचा गैरफायदा घेऊन धनगर समाज आरक्षण मागत आहे़ यास आदिवासी समाजाचा विरोध असून, धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केल्यास ९ आॅगस्टला मोठे आंदोलन करण्यात येईल, असे या निवेदनात म्हटले आहे़ तहसीलदार राम बोरगावकर यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले़ प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास आदिवासी समाज तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी निवेदनात दिला आहे़ निवेदनावर प्रकाश शेळके, भगीरथ मिरासे, नारायण कोकाटे, राजेश्वर कऱ्हाळे, कुंडलिक निंबाळकर, प्रसाद माघाडे, डॉ़ सतीश पाचपुते, ज्ञानेश्वर घोगरे, खुशाल चिभडे, ज्ञानेश्वर दळवे, सुभाष सोनुने, भास्कर माघाडे, पंढरी चिभडे, किशन निंबाळकर, शिवप्रसाद घोगरे यांच्यासह आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत़ (वार्ताहर)घोषणांनी जिंतूर दणाणलेआदिवासी समाजाने आपल्या हक्क आरक्षणात इतरांचा समावेश करू नये, यासंदर्भात मोर्चामध्ये जोरदार घोषणाबाजी केली़ या घोषणाबाजीमुळे जिंतूर शहर दणाणले़ राजकीय पक्षाला लाजवेल असा हा मोर्चा होता़ मोर्चातील मागण्यांचे फलक महिलांनी हातात धरून जोरदार घोषणाबाजी केली़ जिंतुरात पहिल्यांदाच शक्तीप्रदर्शनआदिवासी समाजाने आपल्या न्याय्य हक्कासाठी मोठे शक्तिप्रदर्शन केले. विशेष म्हणजे तालुक्यामध्ये या समाजाचा मोठा नेता नाही केवळ समाजावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात समाज बांधवांनी एकजुट दाखविली़ त्यातच मोर्चामध्ये पुरुषांप्रमाणेच महिलांचा समावेशही लक्षणीय होता़