शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

शाळा गंडातराने वाढविला अतिरिक्त शिक्षकांचा पेच

By admin | Updated: April 19, 2015 00:49 IST

बीड : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांमुळे पेचात असताना त्यात शुक्रवारी भर पडली

बीड : जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांमुळे पेचात असताना त्यात शुक्रवारी भर पडली. बृहत आराखड्यातील ६३ शाळांमध्ये आरटीई निकष डावलले गेल्याचा अहवाल सहायक शिक्षण संचालकांनी दिल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या हजाराकडे गेली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ८ हजार ५६४ इतके शिक्षकांची पायाभूत पदे मंजूर आहेत. ३० सप्टेंबरच्या पटसंख्येनुसार चालू वर्षीची संचमान्यता मिळणे आवश्यक होते. मात्र, अद्यापपर्यंत संचमान्यतेवर मंजुरीची मोहोर उमटलेली नाही. बृहत आराखड्यामध्ये २२१ शाळा मंजूर झाल्या होत्या. या शाळा सुरू करताना आरटीई निकष डावलले जाणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे होते. मात्र, काही शाळांनी नियमांना फाटा दिला. तीन महिन्यांपूर्वी सहायक संचालक दिनकर टेमकर यांनी ४० गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकांमार्फत बृहत आराखड्यातील सर्वच शाळांची तपासणी केली. यामध्ये ६३ शाळांमध्ये अनियमितता आढळली. याचा अहवाल बाहेर आल्यानंतर ६३ शाळांमध्ये प्रत्येकी दोन असे मिळून १२६ शिक्षक अतिरिक्त ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात ९२६ शिक्षक आले. त्यापैकी काही जणांना पदस्थापना मिळाल्या. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचा आकडा ८४७ असा होता. या शिक्षकांच्या पदस्थापनेबाबत काय करायचे ? हा प्रश्न जिल्हा परिषद प्रशासनासमोर होता. त्यातच बृहत आराखड्यातील ६३ शाळा गोत्यात आल्यामुळे १२६ शिक्षकांची भर पडली आहे. परिणामी अतिरिक्त शिक्षकांची संख्या ९७१ इतकी झाली आहे.दरम्यान, अतिरिक्त ठरलेले शिक्षक मागील वर्षभरापासून विनावेतन आहेत. पदस्थापना, वेतनाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान जिल्हा परिषदेसमोर कायम आहे. (प्रतिनिधी)