५३ बाधितांची भर, ३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:13 IST2021-02-05T04:13:15+5:302021-02-05T04:13:15+5:30

--- औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी अनुक्रमे २१ आणि ३२ बाधितांची भर पडली, तर ४८ तासांत तीन बाधितांचा ...

Addition of 53 victims, 3 deaths | ५३ बाधितांची भर, ३ मृत्यू

५३ बाधितांची भर, ३ मृत्यू

---

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी अनुक्रमे २१ आणि ३२ बाधितांची भर पडली, तर ४८ तासांत तीन बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, ७२ जणांना सुटी देण्यात आली. जिल्ह्यातील उपचार सुरू रुग्णांची संख्या १०३ झाली आहे.

आजपर्यंत ४५ हजार ५१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४६ हजार ८४८ झाली आहे. आजपर्यंत एकूण १२३५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सध्या एकूण १०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे बुधवारी जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

मनपा हद्दीत ४५ रुग्ण

--

जुना मोंढा १, उल्कानगरी १, एन-वन सिडको १, छावणी परिसर १, मुकुंदवाडी २, शिवशंकर कॉलनी १, बीड बायपास १, शिवाजीनगर १, पुंडलिकनगर २, हिंदी विद्यालय १, चिकलठाणा १, एन-दोन सिडको १, ओम गणेशनगरी १, होनाजी नगर, हर्सूल १, सिडको १, हर्सूल सावंगी १, देवळाई रोड, परिसर १, नारळीबाग १, एन-२ सिडको १, हनुमाननगर १, समर्थनगर २, मिटमिटा ३, बीड बायपास रोड परिसर २, निराला बाजार २, अन्य १४, तर ग्रामीण भागात अन्य ८ जण बाधित आढळून आले.

--

तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू

---

घाटीत फुलंब्री तालुक्यातील जातेगावातील ७५ वर्षीय महिला, शहरातील खासगी रुग्णालयात खोकडपुऱ्यातील ६७ व शाहनूरवाडीतील ७८ वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: Addition of 53 victims, 3 deaths