शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसाला पाठीशी घातल्याचा आरोप़़़

By admin | Updated: May 9, 2015 00:54 IST

लातूर : पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या दुचाकीच्या धडकेत लातूरच्या सोना नगर भागातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी

लातूर : पोलिस कर्मचाऱ्याने दिलेल्या दुचाकीच्या धडकेत लातूरच्या सोना नगर भागातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी शुक्रवारी पोलिस यंत्रणेवर रोष व्यक्त केला़ पोलिस कर्मचाऱ्यावर मरणास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्याचे एमआयडीसी ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर मयताच्या पार्थिवावर शुक्रवारी सायंकाळी खाडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले.पोलिस मुख्यालयातील कर्मचारी प्रेमसिंग राजपूत हे त्यांच्या कुटुंबातील चौघा सदस्यांसह २६ एप्रिल रोजी एमआयडीसी भागातून जात होते़ याचवेळी सोना नगर (कुलस्वामीनी नगर) भागातील लाँड्रीचा व्यवसाय करणारे युवराज लक्ष्मण विहिरे (वय ५०) हे त्यांच्या पत्नीसह दुचाकीवर बसून जात असताना २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७़३० वाजता एमआयडीसीतील विश्रामगृहासमोर दोघांच्या दुचाकीची समोरासमोर टक्कर झाली़ या अपघातात युवराज विहिरे गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर लातूरच्या औसा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते़ उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, ७ मे रोजी मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला़ याबाबत ६ मे रोजी एमआयडीसी पोलिसात नोंद आहे.या घटनेची माहिती समाज बांधवांना कळाल्यानंतर त्यांनी घटनेचा व परिस्थितीचा मागोवा घेतला़ त्यानंतर मयताच्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी ८ मे रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून मयताच्या अपघाताची नोंद करण्यामध्ये पक्षपात झाल्याचा आरोप करीत तेथील अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ २६ एप्रिल ते ७ मे या कालावधीत एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेताना पक्षपात केला असल्याचा आरोप शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमलेल्या समाज बांधवांनी केला़ तसेच पोलिस कर्मचाऱ्याच्या दुचाकी बाबत योग्य शहानिशा झाली नसल्याचे काही जणांचे म्हणणे होते़ तपासीक पोलिसांनी अपघाताला जबाबदार असणाऱ्या पोलिसाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही उपस्थितांनी केला़ यावेळी एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक यु़एऩ घुले यांनी समाजबांधवांशी बोलून मरणास कारणीभूत ठरल्याचे कलम दाखल करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मयत युवराज विहिरे यांच्या पार्थिवावर खाडगाव येथील स्मशानभूमीत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार केले़