शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी भरती लाच प्रकरणी उमरीत ‘एसीबी’ने केली कर्मचाऱ्यांची चौकशी

By admin | Updated: August 21, 2014 00:20 IST

अंगणवाडी भरती लाच प्रकरणी उमरीत ‘एसीबी’ने केली कर्मचाऱ्यांची चौकशी

उमरी : येथील बालविकास प्रकल्प अधिकारी शांता सुरेवाड यांना ३० हजाराची लाच घेताना पकडण्यात आले. या प्रकरणी कार्यालयातील पर्यवेक्षिका व कारकून या सर्व कर्मचाऱ्यांची आज २० रोजी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक संजय कुलकर्णी, पोलिस जमादार सय्यद सादिक, पोलिस नायक महम्मद पठाण यांनी उमरीच्या बालविकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका व ईतर कर्मचारी आदींची स्वतंत्रपणे चौकशी केली. सदर लाच प्रकरणात तसेच भरती प्रक्रियेत या कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरित्या सहभाग किंवा ईतर काही लेखी पुरावे याबाबत ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी तपास केला. ७ आॅगस्ट रोजी बळेगाव ता. उमरी येथील एका मदतनीस कर्मचारी भरती प्रकरणात नियुक्ती आदेश देण्यासाठी ३० हजाराची लाच घेताना बालविकास प्रकल्प अधिकारी शांता अमृतराव सुरेवाड यांना एसीबीने रंगेहात पकडले होते. उमरी तालुक्यातील सिंधी गोळेगाव, बोथी, बळेगाव या विभागातून ३ अंगणवाडी सेविका, ८ मिनी अंगणवाडी सेविका व १४ मदतनीस अशा एकूण २५ कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया झाली. प्रारंभापासूनच ही भरती वादग्रस्त झाली अपात्र उमेदवारांना बोगस कागदपत्राआधारे पात्र ठरवण्याचा प्रयत्न होत असल्याच्या व अन्याय, पक्षपात होत असल्याच्या तक्रारी झाल्या. मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत भरती झाली. शेवटी एका उमेदवाराकडून ३० हजाराची लाच घेताना खुद्द प्रकल्प अधिकारी चतुर्भूज झाले. झालेली सर्वच भरती प्रक्रिया आता संशयास्पद असल्याच्या तक्रारी होत असून पुन्हा भरती करण्याची मागणी होत आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शांता सुरेवाड यांना तात्काळ निलंबित करुन त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)