महिलांच्या हस्ते होणार शनिदेवाला अभिषेक

By Admin | Updated: February 9, 2016 00:31 IST2016-02-09T00:18:42+5:302016-02-09T00:31:42+5:30

औरंगाबाद : सध्या शिंगणापूर येथे शनीच्या चौथऱ्यावर महिलांचा प्रवेश, या विषयावर प्रचंड वादंग उठले आहे. या विषयावर चाललेली चर्चा, खलबते पाहून

Abhishek will be present at the hands of women | महिलांच्या हस्ते होणार शनिदेवाला अभिषेक

महिलांच्या हस्ते होणार शनिदेवाला अभिषेक


औरंगाबाद : सध्या शिंगणापूर येथे शनीच्या चौथऱ्यावर महिलांचा प्रवेश, या विषयावर प्रचंड वादंग उठले आहे. या विषयावर चाललेली चर्चा, खलबते पाहून जणू महिलांसाठी शनीची उपासना करणे वर्ज्यच असल्याची जनसामान्यांची समजूत झाली आहे. अशातच सुप्रसिद्ध शनिसाधिका डॉ. विभाश्री दीदी या प्रकरणातील अनेक सुप्त कंगोरे उलगडून दाखवणार आहेत.
यासाठी त्यांनी शनिभागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे. याद्वारे या प्रकरणातील तथ्य त्या लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहेत. जवळपास ३०० महिला शनिभागवत ज्ञानयज्ञात सहभागी होणार आहेत.
एकीकडे शिंगणापूर येथील चौथऱ्यावर महिलांचा प्रवेश निषिद्ध मानला जात आहे आणि त्याच वेळी दुसरीकडे आपल्या शहरातील शनिसाधिका डॉ. विभाश्री शनिभागवत कथेचे वाचन करणार आहे.
सृजन वाहिनी महिला मंडळ, सांस्कृतिक महिला मंडळ, अग्रवाल महिला समाज, बंजारा महिला मंडळ, ममता महिला मंडळ, राजस्थानी महिला मंडळ, मारवाडी महिला मंडळ, गुरुदत्त भजनी मंडळ या महिला मंडळांचा या ज्ञानयज्ञात सहभाग असणार आहे.
तिरुमला मंगल कार्यालय येथे दि. १९ ते २५ फेब्रुवारीदरम्यान सायं. ६ ते रात्री १० या वेळात शनिभागवत कथेचे आयोजन (पान २ वर)

Web Title: Abhishek will be present at the hands of women