दुचाकीला भरधाव कारची धडक, पैठणच्या माजी उपनगराध्यक्षांसह शिक्षकाचा अपघातात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 16:53 IST2025-10-04T16:52:14+5:302025-10-04T16:53:13+5:30
वसाहतीबाहेर पडताच दुचाकीला कारने उडवले

दुचाकीला भरधाव कारची धडक, पैठणच्या माजी उपनगराध्यक्षांसह शिक्षकाचा अपघातात मृत्यू
पैठण : शहराजवळ असलेल्या शशिविहार वसाहतीच्या गेटसमोर शेवगाकडून येणाऱ्या कारने दुचाकीवरील दोघांना जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार पैठणचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे आणि शिक्षक संभाजी कर्डिले यांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास झाला.
शशिविहार वसाहतीमध्ये राहत असलेले माजी उपनगराध्यक्ष तथा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पिसे, तसेच त्यांचे शेजारी शिक्षक कर्डिले हे दोघे रात्री १०:४५ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात असताना वसाहतीच्या गेटसमोरच शेवगावकडून पैठणकडे येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, यात कारची समोरची बाजू चक्काचूर झाली, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ पैठण शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केल्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद यादव यांनी सांगितले.