शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

अर्थसंकल्पातून मराठवाड्यातील नदीजोड प्रकल्पासाठी स्वतंत्र निधीची अपेक्षा होती; पण...

By बापू सोळुंके | Updated: July 24, 2024 20:24 IST

अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भासाठी ६०० कोटी रुपये दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

छत्रपती संभाजीनगर : दुष्काळावर मात करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला देण्यासाठी राज्य सरकारचा नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. या प्रस्तावाला अर्थसंकल्पात निधी मिळण्याची अपेक्षा होती, मात्र असे घडले नाही.

अर्थसंकल्पात मराठवाडा आणि विदर्भासाठी ६०० कोटी रुपये दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. मात्र, हा निधी मराठवाड्याला मिळतो की, विदर्भाकडे वळवितात, याकडे मराठवाड्यातील जलअभ्यासकांचे लक्ष लागले आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या हक्काचे पाणी अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील मंडळी दरवर्षी अडवून धरतात. दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला देणे, हाच एकमेव पर्याय आहे. २०१४ साली राज्य सरकारने केंद्राला नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव दिला होता. यासाठी हजारो कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. केंद्र आणि राज्य सरकार काही टप्पे करून हा निधी उपलब्ध करून देऊ शकतात. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून निधीची अपेक्षा होती. अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सिंचनासाठी ६०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली, पण नदीजोड प्रकल्पाच्या शीर्षाखाली हा निधी मंजूर करण्यात आला नाही. यामुळे प्राप्त निधीचा विनियोग कोठे होतो, हे पाहणे गरजेचे आहे.

किती निधी मराठवाड्याला मिळेल हे स्पष्ट नाहीखरे तर सिंचनाचा विषय हा महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारित आहे. यामुळे मराठवाड्यातील सिंचनाच्या प्रश्नांवर लक्ष देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी आणि विशेषत: मराठवाड्यातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष काही करण्यात आले नाही. मराठवाडा आणि विदर्भातील सिंचनासाठी ६०० कोटी रुपये मिळाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. यातील किती निधी मराठवाड्याला मिळेल, हे स्पष्ट नाही.- डॉ. शंकर नागरे, जल अभ्यासक.

कृषी स्टार्टअप्समधून शेतकऱ्यांना प्रोत्साहनभाजीपाला उत्पादन आणि मूल्य साखळी तसेच साठवण आणि विपणन व्यवस्थेसाठी शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था आणि स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रमाणपत्र आणि ब्रँडिंगसाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

सवलती किंवा साहाय्य नाहीबियाणे, कृषिविषयक आणि इतर उद्योगांसाठी प्रोत्साहन व योग्य त्या वातावरणाची गरज असून सातत्याने निसर्गाच्या लहरींमुळे तसेच पूर्णपणे हवामानावर अवलंबून असणाऱ्या बियाणे उद्योगाला या अर्थसंकल्पाकडून खूप काही अपेक्षा होत्या, पण यावर्षी पण काही सवलती किंवा साहाय्य जाहीर झाले नाही.- समीर पद्माकर मुळे, अध्यक्ष, ‘सियाम’

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाriverनदीWaterपाणी