शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
3
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
4
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
5
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
6
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
7
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
8
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
9
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
10
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
11
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
12
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
13
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
14
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
15
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
16
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
17
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
18
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
19
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
20
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवर उभारणार ८५ कोटींचे भव्य 'पीडब्ल्यूडी' संकुल; मंत्र्यांनी दिली डिझाईनला मंजुरी

By बापू सोळुंके | Updated: April 20, 2026 12:30 IST

बांधकाम विभागाचे प्रशासकीय संकुल, जालना रोडच्या सौंदर्यात भर घालणार ८५ कोटींची इमारत

छत्रपती संभाजीनगर: सार्वजनिक बांधकाम विभागाची आणखी एक बहुमजली इमारत जालना रोडच्या सौंदर्यात भर घालणार आहे. हायकोर्टालगत असलेल्या विद्युत विभागाच्या जागेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल उभारण्यात येणार आहे. मुख्य अभियंत्यापासून सर्व अभियंते येथे असतील. विभागाचे एकत्रित प्रशासकीय संकुल म्हणून ती इमारत असणार आहे. बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेसिंह भोसले यांनी सदरील इमारतीच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे. इमारतीच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात ८५ कोटींच्या अंदाजपत्रकाला मान्यता मिळाली आहे. बांधकाम विभागाचे सध्या चार कार्यालये शहरात आहेत. मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व सर्कलसह विद्युत विभाग मिळून चार कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालय प्रशासकीय संकुलात एकाच ठिकाणी असणार आहेत.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये अशी...प्रशासकीय मान्यता : राज्य शासनाने या संकुलाच्या उभारणीसाठी आवश्यक प्रशासकीय मान्यता दिली असून, यासाठी सुमारे ८५ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.एकात्मिक कार्यालय: या संकुलात सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मंडळ कार्यालय आणि जागतिक बँक प्रकल्प यांसारखी सर्व महत्त्वाची कार्यालये एकाच छताखाली आणण्याचे नियोजन आहे.ठिकाण: हे संकुल जालना रोडवरील आकाशवाणी परिसरातील बांधकाम विभागाच्या च्या स्वतःच्या सुमारे ५ एकर जागेवर उभारले जाणार आहे.आधुनिक सुविधा: इमारतीमध्ये प्रशस्त पार्किंग, आधुनिक कॉन्फरन्स हॉल, लिफ्ट आणि अभ्यागतांसाठी अद्ययावत सुविधा असतील.

मुख्य अभियंता काय म्हणाले...बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्ररसिंहराजे भाेसले यांनी इमारतीच्या डिझाईनला मंजुरी दिली आहे. जागतिक बँक प्रकल्प विभागाकडून इमारतीचे काम करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे.-अतुल चव्हाण, मुख्य अभियंता, पीडब्ल्यूडी

English
हिंदी सारांश
Web Title : Chhatrapati Sambhajinagar to get ₹85 crore PWD complex on Jalna Road.

Web Summary : An ₹85 crore multi-story PWD administrative complex will be built on Jalna Road, Chhatrapati Sambhajinagar. The design is approved, consolidating offices for efficiency. It will house key departments and modern facilities, aiming completion within two years.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरtourismपर्यटनhotelहॉटेल