शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातील मैत्रीचा क्रूर अंत; इंस्टाग्रामवर ज्यांचे स्टेटस ठेवले, त्यांनीच केला गुन्हेगाराचा घात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 18:46 IST

मृतावर आठ गंभीर गुन्हे; मुख्य हल्लेखोरही २०२१ मधील बनावट नोटांच्या रॅकेटचा मास्टरमाइंड

छत्रपती संभाजीनगर : कारागृहातील ओळखीनंतर ज्यांना मित्र मानले, ज्यांच्या सोबत पार्टी केल्यानंतर छायाचित्र काढून इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले, त्यांनीच गुन्हेगार रोहित ऊर्फ करण रवी मस्के (२५, रा. राजनगर) याचा केवळ जुन्या वादाचा खोचकपणे उल्लेख केल्याने घात केला. विशेष म्हणजे, यातील मृतासह मारेकरीदेखील पुंडलिकनगर, मुकुंदवाडीत फोफावलेल्या गुन्हेगारीच्या टोळ्यांचे सदस्य आहेत. मृत रोहितवर तब्बल ८ गंभीर स्वरूपाचे, तर इतरांवर हत्येचा प्रयत्न, दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

गेल्या दहा वर्षांमध्ये स्थानिक पोलिसांच्या गुन्हेगारांसोबतची ऊठबस व निष्क्रियतेमुळे पुंडलिकनगर, मुकुंदवाडीत गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात फोफावली. अनेक युवक गुन्हेगारीकडे वळले. सोशल मीडियावर राजरोस शस्त्र, गुन्ह्यांचे उदात्तीकरण सुरू झाले. नशेखोरी वाढली. आठ दिवसांपूर्वी पुंडलिकनगरमध्ये कुख्यात गुन्हेगार पवन दिवेकर, नीलेश रांजणेच्या टोळ्यांमध्ये गोळीबार झाला. त्याच परिसरात पुन्हा गुन्हेगारांच्या पार्ट्या अन् हत्येमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. मंगळवारी रात्री या सर्व गुन्हेगारांनी पार्टी करण्याचे ठरवले होते. साईनगरमध्ये पार्टी झाल्यानंतर हे शिवाजीनगरमधील एका मैदानात बसले आणि तेथे ही घटना घडली.

२०२३ मधील हल्ला, खंडणीनंतर आला चर्चेत-मार्च २०२३ मध्ये कुख्यात गुन्हेगार मुकेश साळवे, विकी ऊर्फ हेल्मेट सोनकांबळे, मुकेश ऊर्फ मुक्या साळवे, बालाजी पिवळ या टोळीने खंडणी मागून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. यात रोहितसह ‘मकोका’अंतर्गत सर्वांना अटक झाल्यानंतर २०२५ ऑगस्टनंतर सर्व जामिनावर सुटले.-८ मार्च २०२६ रोजी सिडको बसस्थानकापर्यंत सोडण्याची विनंती करणाऱ्या महिलेला लिफ्ट देणाऱ्या तरुणाला लुटण्यात आले होते. यातही रूपाली पाटील नामक महिलेसोबत रोहितला अटक झाली होती.-त्याच्यावर मुकुंदवाडी ठाण्यात २०२३ मध्ये प्राणघातक हल्ला, मारहाण, २०२२ मध्ये मृत्यूस जबाबदार, २०२४ मध्ये बेकायदेशीर शस्त्रसाठा, मारहाण, २०२५ मध्ये जबरी चोरी, दरोडा असे ८ गुन्हे आहेत.

पडूळ बनावट नोटांचा मास्टरमाइंडडिसेंबर २०२१ मध्ये पुंडलिकनगर पोलिसांनीच बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यात अक्षय अण्णासाहेब पडूळ (३०, रा. गजानननगर) हा त्या रॅकेटचा एक मास्टरमाइंड होता. त्यात त्याला अटक झाली होती. त्यानंतर तो जामिनावर सुटला.

अन्य हल्लेखोर कुख्यात गुन्हेगारशेख बादशाह शेख बाबावर पुंडलिकनगरमध्ये २०२५ मध्ये दरोडा, लुटमार, २०२४ मध्ये हत्येचा प्रयत्न, २०२२ मध्ये बेकायदेशीर शस्त्रसाठा व हत्येचा प्रयत्न, गंभीर मारहाणीचे ४ गुन्हे दाखल.प्रफुल्ल पाखरेवर पुंडलिकनगरमध्येच २०२५ मध्ये हत्येचा प्रयत्न, प्राणघातक हल्ला, मारहाणीचे ३ गुन्हे दाखल.कृष्णा उदावंतवर पुंडलिकनगरमध्ये २०२६ मध्ये मारहाण, हत्येचा प्रयत्न, २०२४ मध्ये लुटमारीसह तीन गुन्हे दाखल.

English
हिंदी सारांश
Web Title : Betrayal in Jail: Instagram Status Led to Gangster's Murder

Web Summary : A gangster was murdered by friends he made in jail after a party. A past disagreement, coupled with rising gang activity, fueled the crime. The victim had eight serious criminal charges against him.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी