शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

वादळी वाऱ्यात जखमी बाल फुटबॉलपटूचा पाय कापावा लागला, तरीही आयुष्याची मॅच हरला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 11:54 AM

छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्याचा तिसरा बळी; फुटबाॅलपटू दक्षची मृत्यूशी झुंज अपयशी

छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्यामुळे पत्रा उडून गंभीर जखमी झालेला ८ वर्षीय दक्ष अभय वारे याची तब्बल ४३ तास मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. उपचार सुरू असताना रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला. फुटबाॅलच्या मॅचमध्ये चमकदार कामगिरी करीत सर्वांची मने जिंकणारा दक्ष आयुष्याची मॅच हरल्याने एकच हळहळ व्यक्त झाली.

शहरात शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्याचा दक्ष हा तिसरा बळी ठरला. शहानूरमियाँ दर्गाह परिसरात शनिवारी सायंकाळी दक्ष (रा. पन्नालालनगर) हा नेहमीप्रमाणे फुटबाॅल क्लाससाठी गेला होता. वातावरणात अचानक बदल झाला आणि जोरदार वारे वाहू लागले. सर्व मुलांनी सुरक्षित जागेकडे धाव घेतली. दक्षनेही धाव घेतली. मात्र, त्याच वेळी वादळी वाऱ्याने पत्रा उडून त्याच्या डोक्याला, हाताला आणि पायाला लागल्याने गंभीर दुखापत झाली. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा पाय मांडीपासून कापावा लागला. पाय गेला तर गेला, दक्ष सुखरूपपणे या सगळ्यातून बाहेर पडावा, अशीच प्रार्थना दक्षला वाचविण्यासाठी प्रत्येक जण करीत होता. मात्र, उपचार सुरू असताना दक्षचा मृत्यू झाल्याची माहिती डाॅ. प्रफुल्ल पांडे यांनी दिली.

अंत्यविधीला गर्दी, अश्रूंचा फुटला बांधदक्षने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराला कळली आणि सर्वांना एकच धक्का बसला. दक्षच्या पार्थिवावर कैलासनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांसह दक्षला रुग्णालयात दाखल करणाऱ्यांपासून ते उपचारासाठी प्रयत्न करणाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला.

मुलांना कसे सांगणार, दक्ष गेला?दक्षच्या अनेक मित्रांचे कुटुंब अंत्यविधीला आले होते. दक्ष हा फुटबाॅलसह मित्रांबरोबर क्रिकेट, बॅडमिंटनही खेळत असे. दक्ष हा सर्वांना सोडून गेला, हे मुलांना कसे सांगायचे, असा प्रश्न अनेकांना पडला होता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यू